संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
बारामती, दि.२६: संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत मुंबईवरील २६ नोव्हेंबर रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्य जय पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment