बारामतीत विमान अपघात तपास पथकाच्या कामात आणला अडथळा आणल्याने नऊ जणांवर गुन्हा दाखल..
बारामती(संतोष जाधव):- बारामतीत दोन वेळा विमान अपघात झाला होता त्यामुळे या परिसरात राहण्याऱ्या लोकवस्ती वरील रहिवाशांना भीती निर्माण झाली होती, वारंवार विमान अपघात होत असल्याने याची चौकशी चालू होती यादरम्यान विमान अपघात तपास पथकाच्या कामात आणला अडथळा आणल्या प्रकरणी रेड बर्ड कंपनीच्या दोन शिकाऊ विमानांचे 19 व 22
ऑक्टोबर रोजी अपघात झाले होते. बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण देणा-या रेड बर्ड
फ्लाईंग स्कूलच्या अपघाताची चौकशी करणा-या
चौकशी अधिका-यांना धमकावण्यासह तपासात
सहकार्य न केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी करण माने, शक्तीसिंग, हर्ष डागर, रेशम चौधरी, अजूष शर्मा, मृणय रिझवी, राकेश सिंग, मार्क डिझूजा, गणेश जगताप यांच्याविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डीजीसीएचे (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हीएशन) विमान अपघात तपास चौकशी अधिकारी पी आनंदन यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, रेड बर्ड प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजी अपघात झाला. त्यानंतर याच संस्थेचे विमान दि. 22 ऑक्टोबर 2023 रोजी कोसळले होते. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या संस्थेचा उड्डाण
परवाना निलंबित केला आहे. सातत्याने होत असलेले अपघात ही गंभीर बाब असल्यामुळे विमान अपघात तपास पथकाने या संस्थेची चौकशी सुरू केली आहे.त्यासाठी या पथकाचे सहाय्यक संचालक आनंदन पोण्णूसामी आणि कणीमोझी वेंधन हे दोघेही दि. 23 नोव्हेंबर रोजी बारामती दाखल झाले. सलग तीन दिवस चौकशीबाबत कामकाज सुरु होते.23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत ही चौकशी झाली. परंतु संबंधित संस्थेकडून तपासकामी कोणतेच
सहकार्य झाले नसल्याचे आणि या तपासात अडथळा आणला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या एकूण नऊ जणांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment