रुग्ण हक्क परिषदेची संविधान जागर सभा!
पुणे: - भारतीय संविधान दिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने संविधान जागर सभेचे आयोजन नारायण पेठ येथे करण्यात आले होते. संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन यावेळी करण्यात आले. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले कि, धाडसाने बोलण्याचे स्वातंत्र्य, लिहिण्याचे स्वातंत्र्य, मत व्यक्त करण्याचे, व्यवसाय - शिक्षण पद्धती निवडण्याचे आणि करण्याचे स्वातंत्र्य, मनासारखा पोशाख करण्याचे, हवे ते अन्न खाण्याचे, पसंतीने लग्न करण्याचे, धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य संविधान देते. कायद्याचे संरक्षण देते. संविधान नसेल तर व्यक्ती स्वातंत्र्य जाईल, शरीरात प्राण असूनही उपयोग राहणार नाही. असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
संविधान जागर सभेत शिक्षण आणि आरोग्य हे आपले मूलभूत अधिकार आहेत. मोफत शिक्षण - मोफत उपचारासाठी आपल्याला संविधानाने दिलेली ताकद वापरून लढावे लागेल. असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
यावेळी अनिल हातागळे, रामचंद्र निंबाळकर, रवींद्र चव्हाण, मिहीर थत्ते, अपर्णा मारणे साठ्ये यांची भाषणे झाली. सभेचे आयोजन प्रभा आवलेलू, कविता डाडर, अभिजित हत्तेसह रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीने केले.
No comments:
Post a Comment