बारामतीत चालुय अवैध दारू आणि मटका.!सर्वसामान्य कुटुंबाला बसतोय याचा फटका..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 9, 2023

बारामतीत चालुय अवैध दारू आणि मटका.!सर्वसामान्य कुटुंबाला बसतोय याचा फटका..!!

बारामतीत चालुय अवैध दारू आणि मटका.!
सर्वसामान्य कुटुंबाला बसतोय याचा फटका..!!
बारामती:- बारामती विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी मात्र अवैध धंदे हे बारामती शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे, जुगार, मटका, दारू याचे प्रमाण वाढत असून याला का पाठीशी घालत आहे हे कळत नसल्याचे महिला भगिनी बोलताना दिसत आहे, वारंवार तक्रारी करूनही असे अवैध धंदे चालूच राहतात याकडे पोलीस प्रशासन मात्र कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे, बारामती सह अनेक गावात असे धंदे उघडपणे चालू असल्याचे दिसत आहे, बारामतीत तर याचा कळसच गाठला आहे, हातभट्टी दारू,अवैध देशी दारू सह मटका खुलेआम चालू असल्याने बारामतीतील नागरिकांनी व महिला वर्गानी नाराजी व्यक्त केली आहे,अनेकांचे कुटुंब उदवस्थ झाले असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नेहमी भाषणात सांगतात अवैध धंदे असलेले मी खपवून घेणार नाही मग नक्की अडचणी येतात कुठे हे मात्र समजू शकले नाही. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग नक्की काय करतंय,कधी कारवाई होईल हे येणाऱ्या काळात पहावयास मिळेल.

No comments:

Post a Comment