बापरे..पगारावरून मशिन ऑपरेटरचा खून;राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३जणांविरुद्ध गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 4, 2023

बापरे..पगारावरून मशिन ऑपरेटरचा खून;राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

बापरे..पगारावरून  मशिन ऑपरेटरचा खून;
राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३
जणांविरुद्ध गुन्हा दाखल..
पुणे :-एका खून प्रकरणाची घटना समोर आली,कारण काय तेही समोर आल्याने वाद कुठल्या टोकाला जातो याच उदाहरण समोर आलं,समजलेल्या माहितीनुसार पगारावरुन झालेल्या वादातून मशिन ऑपरेटरला बेदम मारहाण करुन खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी मालकासह,राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.याप्रकरणी मृतक भिडे यांची पत्नी रेखा (वय ३०) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
शेखर महादेव जोगळेकर (वय ५८), प्रणव शेखर
जोगळेकर (वय २२, दोघे रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (रा. काकडे पॅलेसजवळ, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ
बंटी दत्तात्रय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश भिडे हा आरोपी जोगळेकर यांच्याकडे मशिन ऑपरेटर म्हणून काम करत होते. जोगळेकर व भिडे यांच्यात पगारावरुन वाद झाले होते. दरम्यान जोगळेकर यांनी भिडे यांना फोन करुन कामावर लवकर येण्यास सांगितले होते. भिडे दुसऱ्या दिवशी लवकर कामावर गेले होते. त्यानंतर सकाळी
साडेदहाच्या सुमारास भिडे यांना कार्यालयात चक्कर आली आहे. ते कार्यालयात पडले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भिडे यांची पत्नी रेखा रुग्णालयात गेल्या. तेव्हा जोगळेकर तेथे होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू
झाला. जोगळेकर यांच्या सांगण्यावरुन आरोपी इरकल,मिसाळ, शिंदे, कदम, हरपुडे, नाडकर्णी, शेंडकर यांनी भिडे यांना बेदम मारहाण केली. रुग्णालयात भिडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.दरम्यान, शवविच्छेदन अहवालात भिडे यांच्या डोक्याला
गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दयानंद इरकल राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.

No comments:

Post a Comment