पोलिस व्हॅनवरील लुकलुकणारा दिवा
म्हणजे आकाश कंदील..! पोलिस व्हॅनचा सायरनचा आवाज म्हणजे फटाक्यांचा आवाज...!!अशी असते माझ्या पोलीस दादाची दिवाळी.
बारामती(संतोष जाधव):- पोलीस दादा अहोरात्र अंगावर खाकी युनिफॉर्म घालून जनतेच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणारे पोलिस घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी आधी कर्तव्यला प्राधान्य देतात. कुटुंबासोबत सण, उत्सव साजरी करण्याची संधी पोलिसांना क्वचितच लाभते. सध्या दिवाळीची सर्वत्र धामधूम असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद
ओसांडून वाहत आहे. आमच्यासाठी पोलिस व्हॅनवरील लुकलुकणारा दिवा म्हणजे आकाश कंदील... पोलिस व्हॅनचा सायरनचा आवाज म्हणजे फटाक्यांचा आवाज... संकटात सापडलेला आणि आम्ही वाचवलेला अत्यवस्थ हीच आमची दिवाळी... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देणारा हा भावनिक संदेश सध्या पोलिसांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर झळकत आहे. कोणताही सण,उत्सव असला तरी पोलिस कुटुंबापासून दूर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात.सध्या प्रत्येकजण जोरदार दिवाळी सेलिब्रेशन करत असतानाच 'जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी'
मानून पोलिस चोख कर्तव्य बजावत आहेत. जनता आनंदित तर आमची दिवाळी आनंदित जाईल,आपल्या भावना पोलिस व्यक्त करत आहेत.पोलिस ऑनड्युटी चोवीस तास काम करतात.कामाचे तास निश्चित नसल्याने ड्युटी संपल्यानंतर अचानक अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा बंदोबस्तावर जावे लागते. सण, उत्सवात साप्ताहिक सुट्ट्याही रद्द होतात. अहोरात्र अंगावर खाकी युनिफॉर्म घालून जनतेच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणारे पोलिस घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी आधी कर्तव्यला प्राधान्य देतात.कुटुंबासोबत सण, उत्सव साजरी करण्याची संधी पोलिसांना क्वचितच लाभते. सध्या दिवाळीची सर्वत्र
ओसांडून वाहत आहे. दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळला असून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दिवाळीची मजा लुटत आहेत. मात्र ही दिवाळी शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस चोख कर्तव्य बजावत आहेत.कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येक पोलिसालाच सुट्टी मिळणे शक्य नाही. अचानक काही घडल्यास मनुष्यबळाची कमतरता भासू शकते. पोलिस ठाण्यापासून जवळ राहणाऱ्या पोलिसांना थोडावेळ घरी जाण्याची संधी मिळते.मात्र अन्य कर्मचारी दिवाळीतही ड्युटी करतात.दिवाळीतही रात्री ११ वाजेपर्यंत कर्मचारी कर्तव्यावर असतात.
वाहतूक मार्गी लागण्यासाठी...दिवाळीत बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळलेली
असते. शिवाय, दिवाळीत नवीन कपडे घालून
दिवाळी साजरी करण्यासाठी रस्त्यावर जमतात.
अशा वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते.
नागरिकांना निर्विघ्नपणे दिवाळीची मजा लुटता यावी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाते. महिला पोलिस कर्मचारी देखील वाहतुकीच्या नियोजनासाठी तैनात असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही दिवाळीत घरी वेळ देता येत नाही.
जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ न देणे आणि जनतेचे रक्षण करणे पोलिसांचे पहिले कर्तव्य असून हीच पोलिसांची दिवाळी. नागरिक आनंदित तर पोलिस आनंदित. सण, उत्सवात महिला दागिने परिधान करतात. मात्र एखाद्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्यास ती महिला आनंदी कशी राहील? त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना होणार नाहीत याकडे सणामध्ये विशेष लक्ष द्यावे लागते. वाहतूक सुरळीत
ठेवण्यासाठी रात्री १२पर्यंत पोलिस कार्यरत
असतात. दिवाळीत नागरिक गावी जातात. त्यामुळे घरफोड्या होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून बंदोबस्त ठेवावा लागतो.तसेच मंत्री, खासदार, आमदार यांच्या बंदोबस्तासाठी केव्हाही आणि कुठेही तात्काळ हजर राहावे लागते, मात्र आपल्या घरी ऐन दिवाळीत आपली बायका पोरं आपली वाट पाहत असतील त्यांनाही आपले बाबा,पप्पा, मुलगा,भाऊ आपल्या सोबत सण साजरा करण्यासाठी हवे असतात पण कर्तव्ये आड येत असल्याने आपल्या भावनांवर आवर घालून ड्युटी बजावणे हे आपलं कर्तव्य मानणाऱ्या पोलीस दादाला मानाचा मुजरा..!
No comments:
Post a Comment