धक्कादायक.. जुगार अड्ड्यावर झालेल्या भांडण्याच्या वादातुन तलवारीने थेट सपासप वार करून तरुणाची हत्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 7, 2023

धक्कादायक.. जुगार अड्ड्यावर झालेल्या भांडण्याच्या वादातुन तलवारीने थेट सपासप वार करून तरुणाची हत्या..

धक्कादायक.. जुगार अड्ड्यावर झालेल्या भांडण्याच्या वादातुन तलवारीने थेट सपासप वार करून तरुणाची हत्या..
नांदेड :-भांडणाला कारणच लागतं कुणाची कश्यासाठी भांडण होतील आणि त्यातून ती इतक्या टोकाला जाईल याची कल्पनाच करू शकत नाही नुकताच नांदेड शहरातील सराफ दुकान भागात जुन्या वादातून तलवारीचे वार करून एका युवकाचा हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (6 नोव्हें) रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली
आहे.सागर यादव (रा. नावघाट नांदेड) असे मयताचे नाव असून,केशव पवार (रा. शनिमंदिरजवळ) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष
म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अधिक माहितीनुसार, सागर यादव आणि आरोपी केशव पवार यांच्यात जुना वाद होता. काही दिवसांपूर्वी हा वाद मिटलाही होता. मात्र सोमवारी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून सोमवारी सायंकाळी
साडेसात वाजता सराफा भागात सागर यादव याच्यावर केशवने तलवारीने वार केला. यात सागर यादव याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस पोहोचले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेमकं काय घडलं? इतवारा येथील जुगार अड्ड्यावर सागर यादव आणि केशव पवार यांच्यात सोमवारी दुपारच्या सुमारास भांडण झाले होते. त्यानंतर याच भांडणाच्या रागातून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या पुन्हा हाणामारी झाली.यावेळी झालेल्या हाणामारीत केशव पवारने तलवारीने सागर यादवच्या डोक्यावर वार केले. तसेच सागरचा भाऊ भानू यादव याच्यावरही तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात सागर यादव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.जखमी भानू यादववर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांच्यासह पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले.आतापर्यंत 18 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले,दरम्यान, तलवारीने वार करून युवकाची हत्या केल्याची घटना इतवारा पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. तर,पैश्यांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची फिर्याद
अभिमन्यू मंडले यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 18 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अपर
पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी दिली आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून,
नांदेडमधील तरुणाची हत्या करण्यात आली असून, ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यात दोन गटात हाणामारी होतांना दिसत आहे. मात्र, याचवेळी  दुचाकीवरून आलेलं एक गट गोणीतून तलवारी काढताना दिसत आहे. हातात तलवारी आणि चाकू घेऊन थेट
सपासप वार करण्यात येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment