इंदापूर तालुक्यात कळस वालचंदनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) ला खिंडार आमदार भरणे यांच्या अडचणीत वाढ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 23, 2023

इंदापूर तालुक्यात कळस वालचंदनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) ला खिंडार आमदार भरणे यांच्या अडचणीत वाढ

इंदापूर तालुक्यात कळस वालचंदनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) ला खिंडार आमदार भरणे यांच्या अडचणीत वाढ 
इंदापूर:- तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.गणेश धांडोरे यांनी आज सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मध्ये असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे अजितदादा गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची मोठी राजकीय हानी झाली आहेत गणेश धांडोरे यांची नाराजी दूर करण्यात आमदार भरणे असमर्थ ठरले आहेत गणेश धंडोरे हे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष कालकथित नवनाथ धांडोरे यांचे बंधू आहेत ते सुप्रियाताई सुळे यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्ती होते वालचंदनगर पंचक्रोशी मध्ये  धांडोरे यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणावर आहे त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे धांडोरे यांचे वालचंदनगर व पंचक्रोशीत राजकीय वर्चस्व मोठे आहे गणेश धंडोरे यांना सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर तालुका कार्याध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली आहे पदभार स्वीकारताना वालचंदनगर पंचक्रोशीतील युवक उपस्थित होते गणेश धांडोरे यांच्या नाराजीने भरणे यांची मोठी हानी झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा इंदापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगत आहे.

No comments:

Post a Comment