खळबळजनक..कारवाई केल्याच्या रागातून महिलेने अतिक्रमण निरीक्षकावर पेट्रोल ओतण्याचा केला प्रयत्न..
पुणे:-अतिक्रमण निरीक्षकांने कारवाई
केल्याच्या रागातून महिलेने त्यांच्या अंगावर
बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. महिलेने सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत गोंधळ घातला आहे.ही घटना आहे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकांने केलेल्या कारवाईचा,कारवाई केल्याच्या रागातून महिलेने त्यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. महिलेने सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत गोंधळ घातला आहे.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी चंद्रकला सोमनाथ निलंगे (वय ४५, रा.ताराई सोसायटी, धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक लक्ष्मण जोंधळे
यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली
आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड
रस्त्यावरील बेकायदा व्यवसायिक तसेच अनधिकृत पथकारी व बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. त्याचा राग महिलेला आला होता. तिने बाटलीत पेट्रोल आणले व कारवाई केल्याने निलंगेने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिने बाटलीत पेट्रोल आणले होते.बाटली घेऊन महिला जोंधळे यांच्या अंगावर धावून गेली. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. तेव्हा तिने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ,धमकाविल्याप्रकरणी निलंगेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment