विशाल जाधव मित्र परिवाराच्या वतीने साडी व मिठाईचे वाटप...
बारामती:- दिवाळी पाडवा तसेच भाऊबीज निमित्त देसाई इस्टेटमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवाराच्या वतीने बारामती नगरपालिका महिला स्वच्छतादूत तसेच काही गरीब व गरजू महिलांना भाऊबीज म्हणून साडी वाटप व दिवाळी भेट म्हणून मिठाईचे वाटप करण्यात आले. विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवाराच्या वतीने देसाई इस्टेट व बारामती परिसरामध्ये समाज हिताची अनेक विधायक कामे केले जातात. कोणत्याही व्यक्तीची अडचण असेल किंवा कोणत्याही व्यक्तीला गरज असेल त्यावेळी विशाल जाधव व मित्र परिवाराच्या वतीने शक्य ती मदत तात्काळ केली जाते. समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा तसेच समाजामध्ये महापुरुषांचे विचार रुजावेत म्हणून अनेक महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करून लोकांमध्ये चांगल्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी या साठी अविरत कार्य केले जाते. या कार्यक्रमाप्रसंगी बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक आदरणीय राजेंद्र सोनवणे उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक बबलू जगताप, विशाल जाधव मित्रपरिवाराचे सदस्य सचिन (बंडा शेठ) मोरे, प्रवीण शेठ बोरा, शंकर घोडे सर, कुंदन आवळे,केदार पाटोळे, सागर मोहिते, राज मोरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले की विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवाराच्या वतीने नेहमीच बारामती नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी तसेच समाजातील अनेक लोकांसाठी समाजहिताची व विधायक कामे केली जातात. विशाल पोपटराव जाधव यांनी सर्वांना दिवाळीच्या व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला.
*अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रात विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवाराच्या वतीने सातत्याने विधायक कमे करत आहोत. अशीच कामे करण्यासाठी आम्हाला नेहमीच माननीय अजित दादा पवार यांच्याकडून प्रेरणा मिळत असते. अशाच प्रकारची विधायक व समाजहिताची कामे करण्याची संधी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली मिळो ही पांडुरंग चरणी प्रार्थना."
No comments:
Post a Comment