काय सांगता..चक्क दीड कोटींची खंडणी तीही नातवंडांना भेटण्यासाठी भावाने मागितली बहिणीकडे..
तळेगाव दाभाडे :-ऐकावे ते नवलच खंडणी मागण्याचे प्रकार कसे असतात तेही कुणाला हे समजण्यापलीकडे आहे, नुकताच एक खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल झाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नातवंडांना भेटण्यासाठी गेलेल्या बहिणीकडे लहान भावाने दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे दिले नाहीतर धारावी झोपडपट्टीमधील पोरांना आणून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईतील धारावी येथील दोघांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली.सुरेश पांडुरंग शिंदे, एक महिला (रा.शास्त्रीनगर, धारावी, मुंबई) यांच्यावर आयपीसी 384, 385, 323, 506, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि.
25) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांच्या मुलाचे त्यांच्या लहान भावाच्या मुलीसोबत लग्न झाले आहे.त्यांना दोन लहान मुले आहे. फिर्यादी यांची सून लहान मुलांना घेऊन तिच्या वडिलांकडे राहते. त्यामुळे फिर्यादी या नातवंडांना भेटण्यासाठी भावाच्या घरी
गेल्या होत्या. त्यावेळी भावाने नातवंडांना
भेटण्यासाठी व त्यांना पुन्हा आपल्या घरी
न्यायचे असेल तर दीड कोटी रुपये द्यावे लागतील असे म्हणत खंडणी मागितली.दीड कोटी रुपये दिले नाही तर धारावीमधील पोरांना आणून मारून टाकण्याची धमकी दिली.तसेच शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment