मोरवंची येथे संविधान दिन साजरा....
संविधानाच्या सन्मानार्थ एकवटलेले संविधान प्रेमी.
मोहोळ:- आज 26 नोहेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने (मोरवंची) तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर.येथील संविधान प्रेमींनी संविधानाच्या सन्मानार्थ संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व संविधान वाचवा देश वाचवा अश्या घोषणा देत मोरवंची येथील दलीत समाज बांधवांनी व मोरवंची येथील समस्त ग्रामस्थांनी या रॅली मध्ये सहभागी होऊन संविधान बचावचा नारा दिला.पण दलीत वस्तीचे दुर्दैव असे की देश स्वतंत्र होवुन 75 वर्षे उलटून गेली तरी अजून पर्यंत दलीत वस्तीत समाज मंदीर बांधले गेले नाही.संविधान दिनाचे औचित्य साधून मोरवंची गावातील सरपंच सुरेश धोत्रे (सर),पोलीस पाटील श्रीनिवास कुंभार,उपसरपंच, मेंबर सिद्राम धोत्रे,ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते, संविधान सन्मान सभेचे आयोजन युवराज साबळे, संतोष धोत्रे,अनिल साबळे, डॉक्टर बंडपट्टे,सोमनाथ साबळे,गोवर्धन साबळे, राहुल धोत्रे,बाबासाहेब साबळे,गोपाळ साबळे,भारत साबळे,अशोक साबळे,महेश साबळे,अण्णा साबळे,आशू धोत्रे, पिठू पठाण,किरण साबळे,महादेव साबळे व सर्व महिलांनी व ग्रामस्थांनी या रॅली मध्ये सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment