पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..अट्टल चोराकडून सहा चार चाकी वाहनांचे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 9, 2023

पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..अट्टल चोराकडून सहा चार चाकी वाहनांचे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड.

पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..अट्टल चोराकडून सहा चार चाकी वाहनांचे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड.
फलटण:-फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा नंबर 1626 / 2023 कलम 379,411,109,34 भादवी सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शाहरुख राजू पठाण वय 25 राहणार निरा व त्याची पत्नी पूजा XXXXयांनी टेम्पो 407 क्रमांक एच बारा एम व्ही २७२३ चोरी केला. सदर टेम्पो हा फलटण ग्रामीण पोलिसांनी वडजल गावाजवळ गोपनीय माहिती मिळाल्याने अडवला व सदर दोन्ही आरोपी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये शिरसाई मंदिर चोरीमध्ये पूर्वी अटक होता हे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना ।माहित होते. त्यामुळे सदर आरोपीवर सदर टेम्पो चोरी बद्दल पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून टेम्पो जप्त करण्यात आला .सदर आरोपी व त्याची पत्नी सोबत संशय येऊ नये म्हणून घरफोडी व वाहन चोरी करतात. दोन्ही आरोपी हे अनाथ आहेत त्यांना कोणतीही स्थावर जंगम मालमत्ता नसून त्यांना कुणीही नातेवाईक नाही. हे पोलिसांना माहीत होते. यवत पोलीस ठाणे येथे चोरी करताना चे फुटेज यवत पोलिसांना मिळालेले आहेत ते आरोपीशी मिळते जुळते आहेत.सदर आरोपीकडे चौकशी करता सदर आरोपीने दोन महिन्यापूर्वी जेलमधून सुटल्यानंतर पुणे शहरातून दोन इको कार व एक अल्टो कार चोरी केली आहे तसेच दौंड शहरांमधून दोन मोटरसायकल व यवत पोलीस ठाण्यातून एक
पिकप तसेच जेजुरी पोलीस ठाण्यातून एक पिकप चोरी असे सात वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे सांगून सदर वाहने त्याने पंढरपूर येथील दोन युवकांच्या सांगण्यावरून चोरले होते व त्याची विल्हेवाट ते लावून देतील असे सांगितले होते तसेच इस्लामपूर येथील एक भंगारवाला सदरची वाहने तोडून स्क्रॅप करून विकून देण्याची हमी दिल्याने त्याने चोरली होती व त्यांनाच त्यांच्या आश्वासनामुळे हे टेम्पो 407 देण्यासाठी निघालेला होता.सदर इसमांची नावे खालील प्रमाणे 1 ) माऊली तानाजी वाघमारे 28 राहणार पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
२) सागर रावण वाघमारे 33 राहणार पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
3) अल्ताफ इसराइल खान राहणार इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली वय वर्ष 49 वरील चोरी करणारे पती- पत्नी यांना मान्य असल्याने न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे व चार चाकी वाहने विल्हेवाट लावणारे वरील तिघे या सर्वांना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यांना उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येईल
चोरी करणाऱ्या नवरा बायको आरोपीवर यापूर्वीचे दाखल गुन्हे पेठ नाका या ठिकाणी आरोपी अल्ताफ इसराइल खान याचे भंगारचे गोडाऊन असून सदर ठिकाणी वरील चोरलेल्या
गाडी पैकी एका गाडीची चेसीज नंबर मिळालेली आहे. तसेच पंढरपूर येथील आरोपी च्या मोबाईल मध्ये चोरी करणाऱ्या आरोपीने पाठवलेले गाड्यांचे चोरी केल्यानंतर चे फोटो मिळालेले आहेत... रात्री इस्लामपूर येथील भंगार
गोडाऊन वर छापा मारला असता त्या ठिकाणी अनेक गाड्यांचे सुटे पार्ट व इंजिन निदर्शनास आले. सदर अल्ताफ खान कडे कोणतेही आरटीओ चा वाहन तोडण्याचा परवाना नव्हता किंवा आरटीओने वाहन स्क्रॅप करण्याचा प्रत्येक
वाहनाचा परवाना सुद्धा त्याच्याकडे नव्हता व इतर कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड त्याच्याकडे मिळून आले नाही.यातील चोरी करणारे नवरा बायको आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून इतर आरोपींना आज अटक
करण्यात आलेली आहे व त्यांचा दावा वरील सर्व पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ने जवळजवळ 33 लाख 60 हजार रुपये किमतीची मोटार वाहने उघड केली असून सात लाख 70 हजार रुपये
किमतीचे मोटार वाहन जप्त केलेले आहेत व बाकी वाहने आरोपीने बेकायदेशीरपणे स्क्रॅप केलेली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस उपधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक.
 प्रमोद दीक्षित, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस नाईक अमोल जगदाळे,, श्रीनाथ कदम पोलीस शिपाई श्रीकांत खरात, सोमनाथ टीके, हनुमंत दडस, विक्रम कुंभार, रशिदा पठाण यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment