बारामतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार..?
बारामती:-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अहोरात्र मेहनत घेऊन बारामतीत विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात, भल्या पहाटे या कामावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात हे सर्वज्ञात आहे. असे असताना मात्र करोडो रुपये खर्च करून बारामती शहरात दिमाखात उभी असलेली प्रशासकीय भवन इमारत व या इमारतीत असणारे टोले जंग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असे असताना मात्र या कार्यालयात ऑफिसमध्ये वरीष्ठ लिपिक व शिपाई सोडल्यास कुणीच नसते ना कुठले शाखा अभियंता ना अधिकारी उपस्थित नसतात तर जुन्या कार्यलय पाटस रोड, कैनॉल लगत असणाऱ्या कार्यालयात मात्र ठेकेदार व अधिकारी,शाखा अभियंता मात्र नक्कीच दिसतील हे प्रत्यक्ष पाह्यल्यास लक्षात येईल मग करोडो रुपये खर्च करून बांधलेले प्रशासकीय भवन(सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय)कशासाठी चालू आहे, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या समस्या ऐकणार कोण?कारण अधिकारी जुन्या ऑफिसात आहे तिकडे भेटा असे सांगितले जाते, तर जुन्या ऑफिसमध्ये गेल्यास नवीन ऑफिसमध्ये जावा अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात,संबंधित अधिकारी भेटत नाही फोन केल्यास उचलत नाही यदाकदाचित भेटलेच तर यांना भेटल्यास टाळाटाळ करतात समस्या चे निरसन होत नाही की मागितलेली माहिती मिळत नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले, शाखा अभियंता साईटवर आहे असे सांगतात,नवे व जुने ऑफिस मुळे येणाऱ्या लोकांची हेळसांड होत असते याकडे कधी लक्ष जाईल का?नवीन प्रशासकीय भवन मधील ऑफिस तात्काळ पूर्ण स्टॉप सह चालू करावं या मागणी साठी सार्वजनिक मंत्री,पालकमंत्री महोदय यांना लेखी निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले.
*सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती कार्यालयात(जुने ऑफिस)एखादी नोटीस लावतो त्याप्रमाणे संविधान प्रत चिटकवलेली पहावयास मिळत आहे, याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून कित्येक दिवस झाले अशी प्रत चिटकविलेली दिसते पण साधं फोटो फ्रेम करून आपल्या ऑफिसमध्ये कॅबिन मध्ये सन्मान पूर्वक लावली जाऊ शकत नाही हे दुर्दैव आहे, कारण अधिकारी यांना याकडे लक्ष देयला वेळ नाही ते विकसित होत असलेल्या बारामतीतील काम दर्जेदार होतंय की निकृष्ट होतंय यासाठी वेळ नसेल असे सद्या तरी दिसत असल्याचे चर्चेतून कळतंय.
*कमिशनखोरीमुळे गुणवत्ता घसरली..महाराष्ट्रात काही अधिकारी लाचखोरी कडे वळत असल्याचे काही उदाहरणे..सार्वजनिक बांधकाम विभागात दोन टक्के कमिशन द्यावे लागते, अशी प्रथा पडली. कमिशनचे दर आता पाच टक्क्यांपर्यंत वाढल्याने कंत्राटदारांच्या कामात गुणवत्ता राहत नाही. अभियंता प्रकाश बूब यांच्याकडे सहा लाख ४० हजार रुपये आढळले. ही रक्कम कुठून आली, याची चौकशी होणार आहे. यवतमाळ आणि अमरावती येथील निवासस्थानी त्याने लाचखोरीतून आणखी किती रक्कम जमवली याची चौकशी केली जाणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग हे भ्रष्टाचाराचे कुरण समजले जाते. त्यामुळे कामाचा दर्जा घसरला आहे. एकीकडे शासकीय पगार घ्यायचा आणि दुसरीकडे कमिशन घ्यायची असा पायंडा पडला आहे. काही मोजक्या लोकांनी हा पायंडा पडला आहे. काही मोजक्या लोकांनी हा पायंडा पाडला आहे. त्यामुळे संपूर्ण विभागाचे नाव बदनाम होत आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना शोधून त्यांना घरचा रस्ता दाखवणे आवश्यक आहे,तर नुकताच काही दिवसांपूर्वी सहा लाख रुपये लाच घेताना मुख्य कार्यकारी अभियंता पकडला घेल्याने खळबळ माजली होती. अशी कितीतरी लाचखोरीचे उदाहरणे आहेत.
No comments:
Post a Comment