काय सांगता..म्हणे बारामतीत गुन्हा दाखल झाला तरी आरोपी अटक होत नाही?नग्न व्हिडीओ व फोटो काढून महिलेवर बलात्कार व मारहाण सह असे अनेक प्रकरणे..
बारामती:-बारामती विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सातत्याने प्रयत्न करीत असतात की, गुन्हेगारी कमी झाली पाहिजे मग ती अवैध धंदे असो की महिला अत्याचार असो की सावकारी असो अश्या अनेक प्रकारे होणारे घटना घडू नये यासाठी प्रशस्त असे पोलीस उपमुख्यालय बांधले असून, बारामती,बारामती ग्रामीण, सुपे,माळेगाव याठिकाणी देखील सुसज्ज असे व प्रशस्त पोलीस स्टेशन बांधले आहे मात्र हे सर्व करीत असताना आत्तापर्यंत अनेक अश्या मोठ्या घटना बारामतीत व बारामती तालुक्यात घडत असल्याच्या पहावयास मिळत आहे, यामध्ये गुन्हे दाखल असून देखील यातील आरोपी हे सहसा फरारी का दाखविले जातात?याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत चाललेचा दिसत आहे,बलात्कार, दरोडा,सावकारी,मारामारी,जमीन फसवणूक यासारखे अनेक गुन्हे आहेत की त्यामध्ये अद्यापही गुन्हेगार सापडले नसल्याचे कळतंय, की त्याला जाणून बुजून फरारी दाखविले जाते?हे समजू शकण्यापलिकडे आहे.अश्या किती घटना आहे की त्यामध्ये गुन्हेगार तात्काळ सापडले जात आहे,तर काही फरार दाखविले जात आहे हे लवकरच कळेल याबाबत वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे लवकरच सामाजिक संघटना व महिला मंडळ खुलासा मागणार असून अटक विलंब का होतोय कर्तव्यात कोण पुढारी अडचणी आणतय हे कळणे गरजेचे आहे,पोलीस प्रशासनावर कामाचा ताण आहे पण काही मोकाट, धनदांडगे गुन्हेगारांना पाठीशी घालूनही उपयोग नाही कारण पुढे पुढे ही गुन्हेगारी वाढतच जाते व सर्वसामान्य लोक झालेल्या अन्यायासाठी न्याय मागायला किंवा तक्रार करायला पुढे येण्यास विचार करतील.जर काही गुन्हे खोटे असतील त्यामध्ये गुन्हेगार निर्दोष असेल तर त्याला नक्की सहकार्य करावे, तर एखादा निष्पाप भरडू नये याची खबरदारी अवश्य घ्यावी, अश्या खोट्या केस करून महिला एखाद्याला आर्थिक मोबदल्यासाठी गुन्हे दाखल करून तडजोड करीत असेल व नाहक एखाद्याला बदनाम करीत असतील अश्या महिलांवर कडक कारवाई व्हावी की जेणे करून खोट्या केसेस करताना दहा वेळा विचार करतील, पण एखाद्या महिलेवर खरच अत्याचार झाला असेल तर गुन्हेगाराला पाठीशी न घालता कडक कारवाई देखील झाली पाहिजे यासाठी जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतंय.
No comments:
Post a Comment