सावकारकीतून बेकायदेशीर जमीन घेणे आले अंगलट; बळकावलेली १२ एकर जमीन केली परत...
सोलापूर:- सावकारी वाढत असल्याने अनेकांची जमिनी सावकाऱ्यांनी घशात घातल्याचा घटना पाहिल्या असतील आजही अशीच काहीशी परिस्थिती असून ज्यादा व्याजदराने सावकार घब्बरगंड होत चालला असून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून गुंड पाळून जब्बरदस्तीने वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे, तर काही ठिकाणी सावकारकीत
बेकायदेशीर जमीन खरेदी करून घेणे सावकारांच्या अंगलट आले असून जमीन परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिले
आहेत. वेगवेगळ्या दोन प्रकरणांत १२ एकर जमीन मूळ शेतकऱ्यांना परत देण्याचे आदेश दिले आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ज्ञानेश्वर जालिंदर बोचरे यांनी एका व्यक्तीकडून सावकारकीतून पैसे घेतले होते.त्या मोबदल्यात करकंब येथील गट नंबर ९०५/१ मधील उत्तरेची २ हेक्टर १ आर व गट नंबर ९०५/१ मधील दक्षिणेची २ हेक्टर १ आर अशी १० एकर जमीन खरेदीखत करून घेतली होती. रितसर व्याजाने घेतलेली रक्कम परत दिली. व्याज थकल्यानंतर ज्ञानेश्वर बोचरे यांनी १० एकर जमीन संबंधीत व्यक्तीने पुतणे श्रीराम शिवराम गव्हाणे व राहूल शिवराम गव्हाणे यांच्या नावे खरेदी करून घेतली. श्रीराम व राहूल लहान अज्ञान पालक असल्याने पालनकर्ती आई शुभांगी शिवराज गव्हाणे या होत्या. सावकारकीतून जमीन खरेदी केल्याचे स्पष्ट झाल्याने जमीन मूळ मालकाला परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी काढले आहेत.
No comments:
Post a Comment