ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संताजी गायकवाड यांचे अपघाती दुःखद निधन..
बारामती:-ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संताजी गायकवाड यांचे 25 नोव्हेंबर रोजी मध्य रात्री दुःखद निधन झाले आहे,त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अंत्यत गोड स्वभावाचे सामाजिक कार्यात सदैव झोकून देणारे,वाहन चालक संघटनेत हिरीहिरीने भाग घेऊन काम करणारे म्हणून त्यांचे नाव घेतले जायचं ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ वाढीसाठी खूप मेहनत घेतली, त्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले, क्रिकेट स्पर्धेत त्यांचा सहभाग असायचा आवर्जून त्यांच्या वतीने बक्षीस द्यायचे अश्या या सर्वांना संतुष्ट करणारे संताजी गायकवाड यांचं दुर्दैवी असं अपघाती निधन झालं त्यांच्या आत्म्यास त्यांचे मित्र परिवार बारामती व ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
No comments:
Post a Comment