धक्कादायक..व्हायरल व्हिडीओ मध्ये चक्क 3-3 शिक्षिकांसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे.!
बीड(प्रतिनिधी):-नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकारबीड मध्ये घडला असल्याची माहिती मिळतेय यामध्ये बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकाचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक महिलांसोबत असभ्य
वर्तणूक केल्याची बाब समोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली.संबधित शिक्षकाला 22 नोव्हेंबर रोजी निलंबित देखील करण्यात आले होते. मात्र, या नामांकित शाळेतील व्हिडिओ प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यध्यापकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मुख्याध्यापकाने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत अधिक तपास सुरू केलेला आहे.शाळेतील शिक्षकाने आपल्या शाळेतील महिला शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक करत असलेले शाळेच्या परिसरातले काही व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित तीन महिला शिक्षकांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओ करणारे आरोपी शिक्षक त्याचबरोबर हे व्हिडिओ व्हायरल करणारे जे कोणी आहेत त्यांच्या वर देखील कायदेशीर कार्यवाही करावी, अशी
मागणी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी सदर घटनेची सर्व माहिती घेत गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, एका शिक्षकाने केलेल्या कृत्यामुळे पूर्ण शाळेसह अनेक सहशिक्षक महिला देखील बदनाम होत आहेत.शिवाय, या प्रकरणानंतर अनेक सहशिक्षक महिलांचे संसार उध्वस्त झाले असल्याचे समजते यामुळे महिला शिक्षकामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आली.
No comments:
Post a Comment