अवकाळी पावसामुळे निमसाखर येथील शेतीचे नुकसान..
इंदापूर:- इंदापूर तालुका येथील निमसाखर याठिकाणी दि.३०/११/२०२३ रोजी रात्री आलेल्या वादळी पावसामुळे पिकांचे नूकसान झाले,यामध्ये ज्वारी,मका भूईसपाट झाला तर गव्हावरती तांबूरा पडनार असे चित्र दिसत आहे, तसेच पावसामुळे मोठया प्रमाणात झेंडूचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे, मोठया मेहनतीने पिकविलेल्या या पिकांचे असे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून लवकरात पंचनामे होऊन भरपाई मिळावी अशी अपेक्षा करीत असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment