मेडद मध्ये तीन दुकान घरफोड्या,चोरट्यांचा सुळसुळाट.!
बारामती:-बारामती तालुक्यात व शहरात काही महिन्यांपासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून याला आळा बसणे गरजेचे झालं आहे नुकताच बारामती नजीक माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मेडद येथील माधव झगडे,मुशर्रफ जहांगीरदार व शिवाजी जठार यांच्या दुकानाचा पत्र्याचे स्क्रू काढून पत्रा उचकटून चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले.यामध्ये कोल्ड्रिंक्स,आईस्क्रीम,शालेय साहित्यसह इतर सामान व रोख रक्कम असा माल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले,दि.15/12/2023 च्या रात्री ते दि.16/12/2023 च्या सकाळ पर्यंत च्या दरम्यान चोरी झाली असल्याचे सांगितले.या चोरीत जवळपास 33,952 रुपयांचा माल चोरी झाल्याची माहिती देण्यात आले,याबाबत माळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस अधिक तपास करीत असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
No comments:
Post a Comment