पाटस रोड परिसरातील खराब रस्त्याची अखेर झाली दुरुस्ती..
बारामती:-बारामती शहरातील पाटस रोड परिसरातील ख्रिश्चन कॉलनी, साईनगर , झगडेवस्ती येथील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी रस्त्यावरती खोदकाम करण्यात आलेले होते. त्यामुळे रस्त्याची खूप दुराअवस्था झालेली होती, सदर खराब रस्त्यावरून पाटस रोड परिसरातील नागरिकांना प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे व खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले होते असे श्री.आदित्य हिंगणे यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.महेश रोकडे यांच्या निदर्शनास आणून दिले असता रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आले , त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment