आठ वर्षाच्या लढ्यास यश..झोपडपट्टी परिसरात बसले विद्युत खांब.!
बारामती:- मागील साधारणतः आठ वर्षांपासून आमराई,बारामती मधील झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत ठिकाणी विद्युत खांब बसविण्यात यावेत यासाठी वारंवार बारामती नगरपरिषदेस लेखी निवेदने रविंद्र(पप्पू)सोनवणे(युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI आठवले) यांच्या मार्फत दिली गेली.प्रसंगी आंदोलन देखील करण्यात आले.याचीच दखल घेत आज दि.1 डिसेंबर 2023 रोजी सदरील झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत ठिकाणी सुरवातीचा भाग म्हणून विद्युत खांब बसविण्यात आला .त्याबद्दल सर्व प्रथम
मा. महेशजी रोकडे(मुख्याधिकारी बा. न .प.) मा.संजय सोनवणे(प्र.अधिकारी विद्युत विभाग)आणि मा.सुतार यांचे आभार. लवकरच आमराई मधील उर्वरित झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत ठिकाणी विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत.बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झोपडपटटी परिसरात विद्युत खांब बसविण्यात आल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी देखील समाधान व्यक्त करून रविंद्र (पप्पू) सोनवणे यांचे तसेच बारामती नगरपरिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांचे आणि रिपाइं(आठवले)पक्षातील कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले.
यावेळी सुनील शिंदे(प.महारष्ट्र सचिव),रत्नप्रभा (ताई)साबळे (म.अध्यक्षा पुणे जिल्हा) गणेश मागाडे,सोयल शेलार, लखन लोंढे, शेखर लोंढे आदी सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment