बारामती लोकसभेला सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप लावणार ताकद..?
मुंबई :- नुकताच कर्जत मधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या चार जागांची
घोषणा केल्यानंतर,राजकीय वातावरणात खळबळ माजली, आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामती, सातारा, शिरुर आणि रायगड या लोकसभेच्या चार जागा लढवण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्यानंतर आता भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. बारामतीची जागा भाजपकडून अजित पवार गटाला सोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार जर बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या, तर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप मदत करणार आहे.लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागाबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र असल्याने
महायुतीतील घटक पक्षाच्याही जागा जिंकून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.
बारामतीत सुनेत्रा पवार वि. सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची शक्यता आहे,अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ज्या चार जागांची घोषणा केली, त्यामध्ये बारामतीचा आवर्जून
उल्लेख केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गट उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार गट कोण उमेदवार देणार याची उत्सुकता अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीतून लोकसभेच्या जागेसाठी अजित
पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे.त्यामुळे जर अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, तर इथे नणंद भावजंय यांच्यात लढत होईल.भाजपचं मिशन बारामती दरम्यान, भाजपने मिशन बारामती हाती घेतलं आणि एकच चर्चा रंगू लागली की सुप्रिया सुळे यांच्याविरोधातला उमेदवार कोण? गेल्या अनेक दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात
सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेचा दुसरा टप्पा म्हणजे पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले शुभेच्छांचे बॅनर. पुण्यातील वारजे भागात हे बॅनर लागले आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली.पवार आणि बारामतीचं समीकरण पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार अस समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. सुनेत्रा पवार राज्यातील पावरफुल घराण्यातील पावरफुल सूनबाई. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव
करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा झाली होती. त्याला अजित पवारांनी पूर्ण विराम देखील दिला होता.पण सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त लागलेला बॅनर मधून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांचे उमेदवारीची चर्चा रंगू
लागली . पुण्यातील वारजे भागात सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संसदेचे चित्र असलेला बॅनर लागला आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिवचे पॉवरफुल नेते आणि माजी खासदार आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहे,उपमुख्यमंत्री अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर सुनेत्रा पवार
राजकारणात सक्रिय झाल्या पण थेट राजकारणात त्यांनी कधीही प्रवेश केला नाही तर त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला, ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत.
शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. सावित्रीबाई फुले
विद्यापीठात सिनेट सदस्य अजित पवारांनंतर मुलगा पार्थ आणि जय या दोघांनाही राजकारणात आणण्यासाठी त्या सक्रिय
झाल्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे
यांच्याविरोधात कोण निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित झाला आणि सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले असून याबाबत चांगल्याच राजकीय चर्चा रंगू लागल्या असून येणाऱ्या काळात स्पष्ट चित्र दिसेल.
* बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6
विधानसभा मतदारसंघ येतात.त्यापैकी
बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली,
खडकवासला, भोर- वेल्हा हे विधानसभा
मतदारसंघ येतात.यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत.राष्ट्रवादीचं अजित पवार आणि दत्तात्रय भरणे,काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि संजय जगताप भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत अजित पवारांच्या बंडामुळे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या बाजूला आहेत भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत
पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित
पवारांमुळे निवडून आले आहेत. पण पुरंदर
तालुक्यातील काही जण सोडले तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूला आहे तर भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर ह्याच्यामुळे भाजप दोन राष्ट्रवादी(अजित पवार गट)दोन आमदार असल्याने लोकसभेसाठी पारडे मजबूत असल्याने खासदारकीचे उमेदवार निवडून येऊ शकतो असा अंदाज बांधला गेला असून मागील निवडणुकीत 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.तर 2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते, त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव झाला होता त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने चांगलीच तयारी केल्याचं बोलले जातंय.
No comments:
Post a Comment