सरकारी साक्षीदारांना कोर्टाचा दणका, बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने साक्ष देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांना काढले वॉरंट..
बारामती:- बारामती न्यायालयात दौंड येथे 2012साली झालेल्या एका खून खटल्यात महत्वाची असलेले सरकार पक्षाचे साक्षीदार डॉक्टर व पोलीस हवालदार हे साक्ष देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने कोर्टाने त्यांना वॉरंट काढलं आहे. आरोपीचे वकील श्रीपाद हुशिंग यांनी न्यायाधीश जे.पी.दरेकर यांना अर्ज करून साक्षीदार यांच्यामुळे नैसर्गिक साधनांचा अपव्यय होतं आहे.म्हणून आर्थिक नुकसान देखील होतं आहे. त्यामुळे साक्षीदारांना वॉरंट काढून हजर करण्याचे मागणी केली. आरोपीच्या वकिलांच्या अर्जाला मंजुरी देत न्यायाधीशांनी साक्षीदारांना वॉरंट काढलं आहे.अशा प्रकारे सरकारी साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी वॉरंट काढण्याचे दुर्मिळ प्रकरण असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कीं सेशन केस. नं. 46/2014 हा खुनाचा खटला 2014पासून प्रलंबित आहे. यातील पोस्टमार्टेम केलेले डॉ. अमोल शिंदे जखमीचे दवाखान्यात जबाब घेतलेले पोलीस हवालदार आर. ए. कुंभार. यांची या खटल्यात महत्वाची साक्ष आहे. यापूर्वी दोन वेळा कोर्टाने समन्स बजावून सुद्धा साक्षीदार हजर राहिले नाहीत. त्यामुळे कोर्टाचा बहुमूल्य वेळ,या खटल्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे इंधाना सारख्या नैसर्गिक बाबींचे नुकसान होतं आहे. त्यामुळे सदर साक्षीदारांना वॉरंट काढून हजर करण्याची मागणी आरोपीचे वकील श्रीपाद हुशिंग यांनी केली होती. त्यास न्यायाधीशांनी मंजुरी देत सरकारी साक्षीदार असलेले डॉक्टर व पोलीस हवालदार यांना वॉरंट काढलं आहे.
No comments:
Post a Comment