बारामतीत अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 11, 2023

बारामतीत अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा..

बारामतीत अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा..
बारामती(संतोष जाधव):-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती
अंगणवाडी कर्मचारी संघटना याच्या वतीने बारामतीत भव्य मोर्चा काढण्यात आला,
 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व अन्य मागण्या मान्य न झाल्यामुळे ४
डिसेंबर २०२३ पासून कर्मचारी संपावर जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून ऑनलाईन
काम, सर्वेक्षण, माहिती पाठवणे, मासिक अहवाल व मासिक अहवाल बैठकांवर संपूर्ण बहिष्कार
घालत दि.१६ व १८ नोव्हेंबर २०२३ रोजीचे मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याबाबतचे निवेदन व संपाची कायदेशीर नोटीस द्वारे कळविण्यात आले,अंगणवाडी कर्मचारी आपल्या महत्वाच्या मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून संपावर जात असल्याची तसेच मासिक अहवालावर बहिष्कार घालत असल्याबद्दल आम्ही या अगोदरच आपल्याला सूचना दिलेली
होती. परंतु आपल्याकडून वाटाघाटी करून होणारा संप टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न झाले नाहीत. तरी आम्ही या निवेदवाद्वारे पुन्हा एकदा सूचित करीत आहोत की आमच्या आगामी लढ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील -1. ऑनलाईन कामावर आमचा बहिष्कार सुरूच राहील,
2. नोव्हेंबर महिन्याचा मासिक अहवात व अहवाल बैठका यांच्यावर बहिष्कार सुरूच राहील,
3. ४ डिसेंबर २०२३ पासून राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जातील.4. ११ डिसेंबर २०२३ पासून नागपूर येथील अधिवेशनाच्या हिवाळी सत्रावर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाईल. यामध्ये हजारो अंगणवाडी कर्मचारी दिवस, रात्र रस्त्यावर धरणे धरतील, या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा विनंती करीत आहोत की आपण ताबडतोब कृती समितीसोबत बैठक आयोजित करून मागण्या मान्य कराव्यात व व होणारा संप टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी केली. ११ डिसेंबर २०२३ पासून नागपूर येथील अधिवेशनाच्या हिवाळी सत्रावर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाईल. यामध्ये हजारो अंगणवाडी कर्मचारी दिवस, रात्र रस्त्यावर धरणे धरतील.आमच्या संपाच्या मागण्या पुन्हा एकदा आपल्यासमोर मांडत आहोत.
1. सर्वोच्च न्यायालयाच्या CIVIL APPEAL NO. 3153 OF 2022 {@ SLP [CIVIL] No. 30193 of 2017} मधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी.त्यात म्हटल्यानुसार अंगणवाडी कर्मचारी ही वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी,
ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत.
2.अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करावी. मदतनीस व
सेविकांचे मानधन किमान १८ हजार ते २६ हजारापर्यंत असावे.
3. मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते. तरी मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी.
4. मा. महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानुसार विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन)सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मा. मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करवून घ्यावा.
5. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथील करून अंगणवाड्यांसाठी रु ५००० ते ८००० भाडे मंजूर करावे.
6. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा.आम्ही या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा विनंती करीत आहोत की आपण ताबडतोब कृती समितीसोबत बैठक आयोजित करून मागण्या मान्य कराव्यात व व होणारा संप टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी केली.4. ११ डिसेंबर २०२३ पासून नागपूर येथील अधिवेशनाच्या हिवाळी सत्रावर मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाईल. यामध्ये हजारो अंगणवाडी कर्मचारी दिवस, रात्र रस्त्यावर धरणे धरतील.असा इशारा देत योग्य पाऊलं उचलावीत अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी केली.

No comments:

Post a Comment