बारामतीत भाजपच्या वतीने तीन राज्यात मिळालेल्या यशाचे फटाके वाजवून व पेढे भरवून विजयी जल्लोष साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 3, 2023

बारामतीत भाजपच्या वतीने तीन राज्यात मिळालेल्या यशाचे फटाके वाजवून व पेढे भरवून विजयी जल्लोष साजरा..

बारामतीत भाजपच्या वतीने तीन राज्यात मिळालेल्या यशाचे फटाके वाजवून व पेढे भरवून विजयी जल्लोष साजरा..
बारामती:- तीन राज्यात विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या शिलेदारांना शुभेच्छा देण्यासाठी व भारतीय जनता पक्षाने आज देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डाजी व केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.अमितभाई शाह यांच्या अचुक नियोजनाच्या व लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर राजस्थान,मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपा विजयाचा झेंडा फडकावत निर्विवाद सत्ता मिळवली. या महविजयाच्या निमित्ताने आज बारामती येथील भिगवण चौक येथे भारतीय जनता पार्टी बारामती शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह फटाके फोडून व पेढे व लाडू भरवून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी बारामती विधानसभा प्रमुख रंजन काका तावरे, ऍड जी बी आण्णा गावडे,अभिकाका देवकाते सरचिटणीस पुणे जिल्हा,श्री.प्रकाश किसनराव जगताप अध्यक्ष-भारतीय जनता पार्टी बारामती तालुका,श्री सुजित वायसे अध्यक्ष -भारतीय जनता पक्ष बारामती शहर,श्री.प्रमोद तावरे अध्यक्ष-भारतीय जनता पक्ष माळेगाव शहर,संतोष जाधव सदस्य पुणे जिल्हा भाजप,ऍड ज्ञानेश्वर माने,बापूराव फणसे पंचायतराज,शहाजी कदम,सुधाकर पांढरे, मुकेश वाघेला, पिंकीताई मोरे अध्यक्ष महिला मोर्चा बारामती शहर, वर्षा भोसले अध्यक्ष महिला मोर्चा बारामती तालुका,सारिका लोंढे अध्यक्ष जाती जमाती महिला बारामती, सरचिटणीस पल्लवी वाईकर,व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment