बारामतीत लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या दुकान मालकाचा व मुलीचा अद्यापही लागला नाही शोध?
बारामती:-आजही मुली सुरक्षित नाहीत याची अनेक उदाहरणे पहावयास मिळत आहे, कोणी जब्बरदस्तीने तर कोणी आमिष दाखवून, स्वखुशीने येण्यास प्रवृत्त करून मुली पळविण्याचा थाट मांडला आहे,नुकताच काही दिवसांपूर्वी सावकारकीतून अत्याचार, मारहाण सारखे प्रकार घडले यामध्ये अद्यापही आरोपी सापडले नसल्याचे कळतंय.तर असे कितीतरी घटना घडत असताना व मुली बळी पडत असताना तसेच मिसिंगच्या तक्रारीतील मुली त्यांचे पुढे काय झालं याचा विचार करणं कठीण आहे,तर कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून अत्याचार करून त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल ची धमकी देऊन पुन्हा अत्याचार होतोय याची घटना ताजीच आहे,अश्या अनेक घटनेत मुली, महिला फसतात, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल होतात पण त्याचे पुढे काय तपासात आईवडिलांची होत असेल ससेहोलपट पाहवत नसली तरी नाईलाजाने ती त्या कुटुंबाला स्वीकारावी लागते कारण त्यामध्ये मुलगी फसलेली असते,फसविणारा हा आर्थिक मायाजालने सगळी सूत्रे फिरवीत असतो,म्हणून मुली आजही सुरक्षित नाहीत मागील काही दिवसांपासून बारामती व तालुक्यात घडलेल्या केसेसमध्ये जास्त प्रमाण मुली व महिला अत्याचाराच्या आहे. कुणाला न्याय मिळतो तर कुणाला न्यायापासून वंचित राहावं लागतंय याबाबत सविस्तर लवकरच प्रकाशित करणार असून नुकताच बारामतीत काही दिवसांवर लग्न जमले असताना विवाहित पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेले असल्याची तक्रार दाखल झाली असून याबाबत मिळालेल्या तक्रारी नुसार दि.24/11/2023 रोजी एक गरीब कुटुंबातील इसम समक्ष बारामती शहर पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्यादी जबाब लिहून देतोय कि मी वरील ठिकाणी माझी
पत्नी *** मुलगी ** वय 18 वर्षे 3 महीने,*** वय 13 वर्षे मुलगा ** वय 15 वर्षे असे आम्ही एकत्रित राहणेस असून मी एका सोसायटीत राखनदार म्हणून कामास आहे. त्यावर आमची उपजिवीका चालते आम्ही गरीब कुटुंबातील असून बाहेर गावावरून पोट भरण्यासाठी बारामतीत आलो आहे.माझी थोरली मुलगी ** **** ** वय 18 वर्ष 3 महिने ही गेले 3 वर्षा पासून प्रगतीनगर बारामती येथील दुकानात कामाला जात होती सदर दुकानाचे मालक *** *** याचेकडे कामा मुळे सतत सहवास येत होता व त्याच्या सतत भेटी गाठी होत असत तसेच आमचे व दुकानाचे मालक याचे घरगुती संबंध असल्याने त्याचे आमचे घरी येणे जाणे होते तसेच
आम्ही ही त्याचे घरी वस्तीवर येथे येत जात होतो. माझी मुलगी ** हिचे गेले वर्षी डिसेंबर महीण्यामध्ये लग्न जमले होते परतू तिचे वय कमी असल्याने आम्ही लग्नाचे थांबलो होतो व 1डिसेंबर 2023 रोजी लग्न करण्याचे ठरले
होते गेले दोन महीण्यापुर्वी सप्टेबर मध्ये दुकानाचे मालक *** *** यांनी माझी मुलगी ** हिस नविन मोबाईल घेवून दिला मी तिचे हातात नविन मोबाईल पाहीले नंतर तिस मोबाईल कोणाचा आहे असे विचारले असता तिने दुकानाचे मालक यानी दुकानाचे कामासाठी सतत फोन करावा लागतो असे म्हणून घेवून दिला आहे असे सांगितले त्यानंतरमला शंका आल्याने मी दुकान मालक याचे वर लक्ष ठेवले असता तो काही तरी कारण काढून माझी मुलगी ** हिला वारंवार घरी भेटणेसाठी येत असे अथवा फोन करीत असे तेव्हा मी ** हिला गेले 15 दिवसापुर्वी विचारणा केली असता तिने मला सांगितले की दुकान मालक हा माझी इच्छा नसताना मला त्याचे बरोबर लग्न करण्यासाठी दबाव टाकत आहे असे सांगितले त्यांनतर मी तिचे दुकानात जाणे येणे कमी केले परंतु दुकान मालक हा ** हिला भेटण्याचा प्रयत्न करीत होता तिचे लग्न जमले असल्याने व काही कारणाने ते मोडू नये म्हणून मी गप्प बसलो होतो. त्यानंतर दिनांक
16/11/2023 रोजी सकाळी 09:30 वा.चे. सु।। मी व माझे पत्नी *** असे कामानिम्मीत बारामती राहते घरातून कामानिम्मीत बाहेर गेलो असताना घरामध्ये माझ्या दोन्ही मुली व मुलगा होते त्यानतर 10:30 वा.चे.सुमारास मी व माझी पत्नी घरी आले नंतर माझी थोरली मुलगी ** वय 18 वर्षे 3 महीणे ही घरामध्ये नव्हती तेव्हा मी माझा मुलगा यास मुलगी कोठे असे विचारले असता त्यांने मला सांगितले कि दिदी ही तूम्ही घरातून गेले नंतर लगेच ती दुकान मालक याचेकडे जाते असे सांगून निघून गेली आहे त्यानतर मी दुकान मालक याचे घरी जावून विचारणा केली असता दुकान मालक हा पण
घरी नव्हता त्यावेळी माझी खात्री झाली कि माझे मुलीला दुकान मालक यानेच लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे,तरी दिनांक 16/11/2023 रोजी सकाळी 09:30 वा.चे. सुमारास बारामती येथील राहते घरातून माझी मुलगी हिस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून दुकान मालक रा. प्रगतीनगर बारामती जि. पुणे याने पळवून नेले आहे म्हणून माझी इसम नामे याचे विरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून फिर्यादी जबाबावरून भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६३,३६६ नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू असल्याचे कळतंय.तर संबंधित मुलीचे कुटुंब मात्र महिना झाले मुलीचा शोध लागवा यासाठी चकरा मारतायेत कदाचित मुलीचा घातपात होऊ शकतो अशी त्यांना शंका निर्माण झाल्याने भीतीच्या छायेत वावरत असल्याचे समजते.(क्रमशः)
No comments:
Post a Comment