धक्कादायक घटना..'तुला खल्लासच करतो'म्हणत संशयाचे भूत असणाऱ्या नवऱ्याने पत्नीवर केले सपासप वार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 4, 2023

धक्कादायक घटना..'तुला खल्लासच करतो'म्हणत संशयाचे भूत असणाऱ्या नवऱ्याने पत्नीवर केले सपासप वार..

धक्कादायक घटना..'तुला खल्लासच करतो'म्हणत संशयाचे भूत असणाऱ्या नवऱ्याने पत्नीवर केले सपासप वार..
पुणे :-एका पतीने  चारित्र्यावर संशय घेऊन
पत्नीवर  चाकुहल्ला केल्याची घटना घडली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून  विमाननगर परिसरातून एक घटना समोर आली आहे.'तुझी दुसऱ्या मुलासोबत लफडी आहेत' आणि 'मी तुला सोडत नाही आता खल्लास करतो', अशी धमकी देऊन पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात पत्नी बचावली आहे. विमाननगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस  करत आहेत,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक आढाव त्याच्या पत्नीसोबत पुण्यात राहतो. त्यादिवशी 3 डिसेंबरला अशोक आढाव त्याच्या पत्नीला घेऊन विमान नगर भागातील हॉटेल बॅकस्टेजला गेले होते. या दरम्यान
कोणत्या तरी कारणावरून अशोक आढावचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला. या वादातून अशोक आढावने पत्नीला तुझे लफडे दुसऱ्या मुलासोबत आहे असे बोलून तिला शिविगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली.वाद वाढताच पत्नी हॉटेलमधून बाहेर पडली. त्यानंतर पुन्हा अशोक आढावने तिच्या चारित्र्यांवर पुन्हा संशय घेत होता,तुला सोडत नाही, खल्लास करतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर अशोकने स्वत: जवळ बाळगलेला चाकू बाहेर काढून पत्नीवर सपासप वार करत
तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या घटनेतून बचावली आहे.पत्नीवर झालेल्या हल्ल्यानंतर तिला लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तिचा जीव वाचला
आहे. या प्रकरणी पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अशोक आढाव  विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस देशमुख करीत आहेत.

No comments:

Post a Comment