खळबळजनक...गटशिक्षण अधिकाऱ्याची पदाहून उचलबांगडी, निलंबन किंवा बडतर्फीच्या प्रतिक्षेत,संशयित बदल्यांचे झाले पुन्हा समायोजन..!
अकोले:-नुकताच मिळालेल्या माहिती नुसार अकोले तालुक्याचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांची गटशिक्षण अधिकारी पदाहुन उचलबांगडी करण्यात आली असल्याचे कळाले.अनेक चौकशांमध्ये दोषी आढळून येत असल्यामुळे खताळ यांची खुर्ची काढून घेत अभयकुमार वाव्हळ यांच्याकडे नव्याने चार्ज देण्यात आला आहे. यात मुख्य कार्याकारी
अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्याकारी अधिकारी राहुल शेळके,शिक्षण अधिकारी भास्कर पाटील,गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी फार महत्वाची भुमिका बजावली आहे.खताळ यांनी नियमांना हरताळ फासून ४४
शिक्षकांच्या बदल्या मनमानी पद्धतीने
म्हणजे अक्षरश: बिडिओ साहेबांना देखील
विश्वासात न घेता केल्या होत्या तर, १५
बदल्यांचे समायोजन करताना अनेक
संशयित बदल्या वाटत होत्या. त्यामुळे, त्या
बदल्या देखील पुन्हा तातडीने आदेश
काढून घेण्यात आल्या आहेत. विशेष
म्हणजे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला
होता. त्यांना न्याय मिळाला असून या
प्रक्रियेत ८० पेक्षा जास्त शिक्षक व
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment