स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळातर्फे शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ ऍड.एस.एन.जगताप यांचे हस्ते.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 9, 2023

स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळातर्फे शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ ऍड.एस.एन.जगताप यांचे हस्ते..

स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळातर्फे शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ  ऍड.एस.एन.जगताप यांचे हस्ते..
बारामती:- शरद पवार साहेबांचे कतृत्व, नेतृत्व महान आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळातर्फे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा पहिला शुभारंभ करण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष ऍड.एस.एन.जगताप यांनी केले.बारामती येथील चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होम (बोर्डींग) याठिकाणी स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने येथील मुलांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून जर्कींग व खाऊ वाटपाचा कार्यक्रमा प्रसंगी ऍड.जगताप बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ऍड.संदीप गुजर, बारामती तालुका युवकाध्यक्ष  प्रशांत बोरकर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पैगंबर शेख, तालुका अध्यक्ष वैभव पवार, मा.नगरसेवक सोनू काळे, शुभम अहिवळे, संदीप बनकर, महेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण, गौतम थोरात आणि गौरव आगवणे  इ. मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना श्री.जगताप म्हणाले की, विधायक उपक्रमाने पवार साहेबांचा वाढदिवस साजरा होत आहे याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. अनावश्यक खर्च टाळून गरजवंतांना मदत करण्याचे काम स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाने केले याचा सार्थ अभिमान आहे. बारामती पवार यांची आहे असेही ते म्हणाले.
यावेळी ऍड.संदीप गुजर, शुभम अहिवळे, सोनू काळे उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष नरेंद्र मिसाळ यांनी केले तर शेवटी आभार विठ्ठल आगवणे यांनी मानले. यावेळी चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होम(बोर्डींग)चे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment