प्रशासकीय भवन मधील तहसील,प्रांत कार्यालयातील खाजगी कामगार व एजंट कधी हटवनार...
बारामती:- बारामती विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या बारामतीत मोठमोठे शासकीय कार्यालय आलीत या कार्यालयात सतत गर्दी वाढत असून या कार्यलयात खाजगी एजंट व खाजगी कामगार याठिकाणी वावरताना दिसतात,त्यामुळे अनेकवेळा काही कामगारांकडून व एजंट कडून नागरिकांना नाहक त्रास होत असून याकडे लक्ष जाईल का?अशी प्रतिक्रिया उमटत आहे. नुकताच आटपाडी तालुक्यामध्ये नूतन तहसीलदार सागर ढवळे यांनी असे खाजगी कामगार येण्याचे बंद केले व या धाडसी निर्णयाचं स्वागत होऊन त्यांचे कौतुक होत आहे,पण बारामतीत कधी घडणार अशी आशा व्यक्त होत आहे. प्रशासकीय भवन मधील अनेक कार्यालयात उदा. प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय,भूमिअभिलेख कार्यालय,पालखी मार्ग,दुय्यय निंबधक(खरेदी विक्री कार्यालय) व इतर कार्यलयात अश्या ठिकाणी एजंट व खाजगी कामगार सतत कागदपत्रे हाताळताना दिसतात याबाबत याठिकाणी असणारे cctv फुटेज चेक केल्यास नक्की दिसेल पण असं होणार नाही कारण हे अधिकारी यांचे संपर्कात असल्याचे कळतंय व तश्या नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे, तर दुसरीकडे बारामती तालुक्यातील तलाठ्यांचे काय? त्यातच तलाठ्यांचा मानसिक लूट थांबवावी अशी मागणी होत आहे गाव कामगार तलाठी कार्यालयामध्ये झिरो तलाठी कार्यरत आहेत.कितीतरी तलाठी कार्यालयामध्ये झिरो तलाठ्यांचा वावर असताना दिसून येत आहे,शेतकऱ्यांना कागदपत्रे चुकीचे असल्याचे सांगत आर्थिक लूट केली जाते,जमिनीची नोंदी असो, वाळू,मुरूम,माती पंचनामे असो की इतर काही कामे असो यामध्ये आर्थिक उलाढाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.यासंबंधी लवकरच वरिष्ठ पातळीवर व मंत्रालयातील कार्यालयात सामाजिक संघटना तक्रारी करून कारवाईची मागणी करणार असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment