बारामतीत कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून जबरदस्तीने केलेल्या शरीरसंबंधाचा मोबाईलमध्ये काढलेले अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 6, 2023

बारामतीत कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून जबरदस्तीने केलेल्या शरीरसंबंधाचा मोबाईलमध्ये काढलेले अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार..

बारामतीत कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून जबरदस्तीने केलेल्या शरीरसंबंधाचा मोबाईलमध्ये काढलेले अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार.. 
बारामती:-महिला अत्याचारात वाढ होत असलेली अनेक उदाहरणे आहेत, बारामतीत वारंवार महिलांवर अत्याचार होत असलेल्या तक्रारी वाढत असून काही न्यायाच्या अपेक्षेत आहे तर काही न्याय मागण्यासाठी धडपडत आहे, त्यांची दखल घेण्यास विलंब होतो हे फार दुर्दैवी आहे, हेलपाटे मारून मारून नको त्या पोलीस स्टेशनची पायरी चढायला अश्या विचाराने पीडित महिला पुढे येण्यास धजावत आहे, कुणी खोट्या तक्रारी करते तर कुणी मजबुरीमुळे झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत असतात, अशीच एक घटना घडली याबाबत मिळालेल्या फिर्यादी अर्जावरून सविस्तर असे की,दि. 05/12/2023 रोजी एका पीडित महिला वय 23 वर्षे व्यवसाय घरकाम रा.बारामती यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर राहुन महिला पोलीस यांच्यासमोर तक्रारी जवाब दिला की, मी व माझे पती,सासु व 4 वर्षाचा मुलगा 
असे राहणेस असुन माझे पती गाडी चालवुन त्यावर आम्ही आमचे कुटुंबाची उपजिवीका करतो सन 2022 साली आम्ही आमचे घरी किराणा दुकान चालवित होतो परंतु सध्या दुकान बंद केले आहे.इसम नामे सुरज राजेंद्र पिसाळ रा. यदु पाटील नगर तांदुळवाडी ता बारामती जि पुणे हा सन 2022 साली आमचे घरासमोरील प्राधीकरणाचे पाईपलाईनचे काम करत होता त्यावेळी तो आमचे किराणा दुकानात पाणी बॉटल, थंड पेय विकत घेण्यासाठी येत असे त्यावेळी त्याची आणि माझी ओळख झाली होती त्यादरम्यान त्याने तुम्ही माझे कामगारांना काही किराणा माल लागला तर मी फोन करेन त्याप्रमाणे तुम्ही देत जा व त्याचे पैसे मी आल्यानंतर तुम्हाला देत जाईल असे म्हणुन त्याने माझा मोबाईल नंबर घेतला होता. त्यानंतर तो माझेसोबत वेळोवेळी फोन करुन फोनवर बोलत असे त्यानतर एक दिवस सुरज पिसाळ याने मला तु मला खुप आवडते असे म्हणाला त्यावेळी
मी त्याला माझे लग्न झालेले आहे मला एक मुलगा आहे असे म्हणाले त्यावेळी त्याने मला मी तुझ्यासोबत लग्न करतो.आणि तुझ्या मुलाला पण सांभाळतो असे म्हणुन निघुन गेला.दि. 16/01/2023 रोजी साधारण दुपारी 01/30 वा चे सुमारास मला सुरज पिसाळ याचा फोन आला व मला म्हणाला की, तु आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये नाहीतर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करीन असे म्हणाला त्यामुळे मी घाबरुन त्याचे घराजवळ गेले त्यावेळी सुरज हा माझी वाट बघत रोडवरच उभा होता मी तेथे गेल्यावर त्याने मला तु घरात चल आई घरात आहे असे म्हणुन तो मला त्याचे घरात घेवुन गेला. मी त्याचे घरात गेले त्यावेळी त्याची आई घरात नव्हती, त्यामुळे मी सुरज यास तुझी आई घरात नाही असे म्हणाल्यावर त्याने मला तु सोफ्यावर बस आई आत्ताच बाहेर गेली आहे ती येईल थोड्या वेळात तोपर्यंत आपण गप्पा मारु असे म्हणुन त्याने मला स्प्राईट प्यायला दिला त्यावेळी मी त्याने दिलेला स्प्राईट पिला त्यानंतर 5 मिनीटांनी मला चक्कर यायला लागली काही वेळानतर मी शुध्दीत आलेवर सुरज पिसाळ याने माझेसोबत माझे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचे
जाणवले त्यावेळी मी त्यास तु मला स्प्राईटमध्ये काय टाकुन प्यायला दिले होते असे विचारले असता त्याने मला माझे नको त्या अवस्थेतील त्याचे मोबाईलमध्ये काढलेले अश्लील व्हिडीओ व फोटो दाखविले त्यानंतर त्याने मला तु माझ्यासोबत लग्न कर मी तुला आणि तुझ्या मुलाला सांभाळतो असे म्हणुन त्याने मला तु माझ्यासोबत लग्न केले नाहीतर मी तुझ्या काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करील अशी धमकी दिली. त्यानंतर मी घाबरलेल्या
अवस्थेत घरी निघुन आले. मी खुप घाबरल्याने माझेसोबत घडलेला प्रकार मी कोणालाच सांगितला नाही त्यानंतर साधारण 15 दिवसानंतर सुरज पिसाळ याने मला फोन करुन तु मला भेटण्यासाठी बारामती येथे ये असे
म्हणाला त्यावेळी मी त्यास तुला भेटायला येणार नाही असे म्हणाले असता त्याने मला त्याने त्याचे मोबाईलमध्ये माझे काढलेले अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे मी घाबरुन बारामती येथे गेले त्यावेळी त्याने त्याची मोटारसायकल वरुन मला तारा टॉकिज शेजारील असलेल्या लॉजवर घेवून गेला व त्याने
माझेसोबत माझे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संबंध केले त्यानंतर देखील प्रत्येक 15-20 दिवसाचे अंतराने सुरज हा मला फोन करून माझे काढलेले फोटो व व्हिडीओची धमकी देवुन तु माझे सोबत लग्न कर असे म्हणुन तो मला
बोलावुन घेवुन प्रत्येक वेळी बारामती येथील वेगवेगळ्या लॉजवर नेवुन माझेसोबत माझे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संबंध करीत असे.
त्यानंतर  सुरज पिसाळ हा माझेशी लग्न करतो व मुलाला सांभाळतो असे म्हणुन त्याने मला त्याची मावशी (पुर्ण नाव माहित नाही ) रा इंजिनिअरींग कॉलेज जवळ, माळेगाव बु. ता. बारामती येथे नेवुन माझा मुलगा व मला तेथे सुमारे दोन महिने ठेवले. त्यावेळी तेथे त्याची आई या देखील आमचेसोबत राहत होत्या त्यादरम्यान मी सुरज यास तु माझे सोबत लग्न कर असे म्हणाले असता त्याने चिडुन सुरज व त्याची आई  यांनी मला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन तो मला वारवार लग्न
करण्याचे टाळत होता. तसेच त्याने मला माझा मुलगा *** याला मारण्याची धमकी देवुन माझ्याकडुन ऑक्टोबर 2023 मध्ये जुन्या तहसील कार्यालयाचे बाहेर रोडवर त्याने तेथुन दोन स्टॅम्प पेपर आणुन त्यावर माझ्या सह्या
घेतल्या आहेत. त्यादरम्यान देखील त्याने माझेसोबत माझे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संबंध केले त्यानंतर त्याने मला व माझे मुलाला माळेगाव जाधववस्ती ता बारामती येथे सुमारे दोन महिने ठेवले त्यादरम्यान माझेसोबत
जबरदस्ती शरीरसंबंध केले सुरज पिसाळ याने दि. 16/11/2023 रोजी रात्री 10/00 वा चे सुमारास शेवटचे जबरदस्ती शरीरसंबंध केले त्यानंतर दि 17/11/2023 रोजी सकाळी 08/00 वा चे सुमारास मी कामानिमीत्त
बाहेर चाललो आहे असे सांगुन तो निघुन गेला त्यानंतर तो घरी आला नाही त्यामुळे मी त्यास वारंवार फोन केला असता त्याने फोन उचलुन मी येणार नाही तु तुझे बघ असे म्हणु लागला त्यामुळे दि. 28/11/2023 रोजी मी माझे मामा रा. बारामती जि पुणे यांना व्हॉटसअॅपवर मॅसेज करुन त्यांचेकडे गेले त्यानंतर माझे मामानी माझे आईवडील, मामा मामी, चुलते यांना बोलावुन घेतलेनंतर मी माझेसोबत घडलेला सर्व प्रकार त्या सर्वांना सांगितला त्यानंतर माझे नातेवाईकांनी आपसात चर्चा करुन घडले प्रकाराबाबत तक्रार
देण्यासाठी आज रोजी नातेवाईकासोबत पोलीस स्टेशनला आले आहे. म्हणुन माझी सदर घडले प्रकाराबाबत 1) सुरज राजेंद्र पिसाळ 2) एक महिला *** ***  दोन्ही रा. यदु पाटील नगर तांदुळवाडी ता बारामती जि पुणे याचे विरुध
कायदेशिर फिर्याद आहे असा जवाब दिल्याने फिर्याद दाखल करण्यात आली असून भारतीय दंड संहिता १८६०,कलम ३७६ (२)(n),३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment