स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई एक गावठी पीस्टल व दोन जिवंत काडतुसासह आरोपीला घेतले ताब्यात..
बारामती:- अवैध शस्त्र बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत अंकित गोयल ,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता.मा.वरिष्ठ पो.नि. श्री अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन एलसीबी चे पथक तयार करण्यात आले होते.सदरचे पथक तपासाच्या अनुषंगाने बारामती उपविभागात पेट्रोलिंग करत हजर असताना.दि 20/12/23 रोजी 18/00 वा.चे सुमारास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम मेडद ता.बारामती.जि.पुणे बसस्टॉप जवळ मोकळ्या जागेत रोड लगत थांबला असून त्याचे कमरेला पँटच्या आतील बाजूस एक गावठी पिस्टल लावलेले आहे.आशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून त्यांस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव 1) सागर महादेव कावळे वय 27वर्ष राहणार शिरवली तालुका बारामती जिल्हा पुणे.
असे असल्याचे सांगितले.
त्याचे कब्जामध्ये देशी बनावटीचे एक अग्निशस्त्र व त्यासोबत लागणारे दोन जिवंत काडतुसे मिळून आलेने त्याचे विरोधात माळेगाव पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट कलम 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी माळेगाव पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी मा.अंकित गोयल,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण,मा.आनंद भोईटे अपर पोलीस अधीक्षक, पुणे ,मा. गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा.पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,सपोनी कुलदीप संकपाळ,सहा.फौज बाळासाहेब कारंडे,सहा.फौज रविराज कोकरे,पो. हवा अभिजीत एकशिंगे,पो.हवा.स्वप्निल अहीवळे,पो.नाईक निलेश शिंदे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment