धक्कादायक विधान? अजितदादा गटाचे सर्वच आमदार येणार अडचणीत.?कोणी केले सूचक विधान.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 6, 2023

धक्कादायक विधान? अजितदादा गटाचे सर्वच आमदार येणार अडचणीत.?कोणी केले सूचक विधान.!

धक्कादायक विधान? अजितदादा गटाचे सर्वच आमदार येणार अडचणीत.?कोणी केले सूचक विधान.!
चंद्रपूर:-राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये दोन गट पडले असल्याने पक्ष व कुणाचा यासाठी लढाई चालू असून याबाबत अद्याप ही स्पष्ट निर्णय झालेला नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत त्याच पद्धतीने आमदार नक्की कोणाकडे आहे हे ऐन वेळेस दिसेल याबाबत नुकताच धक्कादायक विधान करण्यात आले आहे याबाबत मिळालेली माहितीनुसार राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन  सुरू होत आहे. या अधिवेशनात अनेक विषयावर चर्चा होणार आहे.विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केलेली
आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या समोर आलेले  पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही गटात खडाजंगी होण्याची शक्यता
वर्तवली जात आहे. मात्र, अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अजितदादा गटाच्या सर्व आमदारांची अडचण
होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अजितदादा
गटाच्या आमदारांना व्हीप काढला जाणार आहे का?, असा सवाल अनिल देशमुख यांना विचारण्यात आला होता.त्यावर त्यांनी मोठं विधान केलं आहे. मागच्या अधिवेशनावेळी अजितदादा गटाचे आमदार कामकाजात
सहभागी झाले नाहीत. केवळ लॉबीत फिरत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्याकडे जाण्यात रस आहे हे स्पष्ट होते. पुढच्या काळात या सर्वांची घर वापसी बघायला मिळेल, असं सांगतानाच या अधिवेशनात व्हीप काढायचीच
वेळ आली तर तो नक्की काढू. काही अडचण नाही, असं सूचक विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार अजितदादा गटाच्या आमदारांना व्हीप पाठवल्यास त्यांच्यावर आता कारवाई होणार नाही.मात्र, कायदेशीर लढाईत हा व्हीप महत्त्वाचा ठरेल. तेव्हा मात्र, अजितदादा गटाच्या आमदारांची अडचण वाढू शकते,असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.मोठ्या प्रमाणावर घरवापसी होणार अजितदादा गटाचे आमदार द्विधा मनस्थितीत असल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला. अजित पवार गटाचे
आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. या सरकारकडून आपल्या मतदारसंघातील जेवढी शक्य असेल तेवढी कामे काढून घ्यायची आणि नंतर परत शरद पवारांकडे यायचे असा विचार करत आहेत. खूप मोठ्या संख्येत आमदार घर
वापसी करतील, असा दावाशरद पवार गटाचे अनिल देशमुख यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment