मतीमंद व मुकबधीर शाळा बाल कल्याण केंद्र येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 7, 2023

मतीमंद व मुकबधीर शाळा बाल कल्याण केंद्र येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा..

मतीमंद व मुकबधीर शाळा बाल कल्याण केंद्र येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा..
बारामती:- दिनांक ७/१२/२०२३रोजी ३डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मतीमंद व मुकबधीर शाळा बाल कल्याण केंद्र कसबा बारामती येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था बारामती शहरच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील मुलांना वही पेन व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड, अजीज शेख बारामती शहर उपाध्यक्ष, फरिद शेख बारामती शहर कार्याध्यक्ष, बारामती शहर महिला सचिव सविता जगताप, बारामती शहर सहखजिनदार सुरज गायकवाड तसेच संजय अहिवळे, दत्ता शिंदे,गार्डी काका,अविनाश हरीहर,विनोद कोकरे,प्रदिप बारवकर,सिराज मोमिन,साकेत कांबळे उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या विशेष मुलांनी स्वतः तयार केलेल्या ग्रिटींग कार्ड देवून सत्कार करण्यात आला, व जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करताना विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत विजयी झालेल्या मुलांचा प्रहार दिव्यांग क्रांती स़स्थां बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड व अजिज शेख यांच्या हस्ते ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment