खळबळजनक..पोलिस उपनिरीक्षकावर 40 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल..
पुणे:-लाच प्रकरणात महसूल व पोलीस खात्यात जास्त कारवाई झाल्याचे दिसत असून नुकताच शहर पोलीस दलातील अलंकार पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या लक्ष्मीनगर पोलीस
चौकीत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर 40 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (ता. २२) सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. कशाबद्दल 40 हजार रूपयांची लाच घेतली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक गणेश
चव्हाण हे अलंकार पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या लक्ष्मीनगर पोलीस चौकीत कार्यरत आहेत. त्यांनी 40 हजार रूपयांची लाच घेतली. मात्र, ती कशासाठी घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एसीबीचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत असून, लवकरच माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकावर 40 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
No comments:
Post a Comment