महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा...
बारामती:- महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती शाळेत शुक्रवार दिनांक 26/1/2024रोजी शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे श्री ज्ञानदेव पवार लष्करातून निवृत्त झालेले सुभेदार यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले,कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य श्री निकेतन उंडे व संस्थाधिक्षक श्री.व्ही. के. सोनवणे सर ,दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. लंकेश्वर मॅडम व आढाव मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद ,कर्मचारी आणि पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी बालवाडीच्या मुलांनी देशभक्तीपर गीतावर लेझीम व नृत्य सादर केले तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.
No comments:
Post a Comment