वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित..
बारामती- बारामतीत वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन चालू होते बारामती शहरामधील मधील गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील जागेमध्ये एस टी महामंडळने मूळ मालकांना विचारात न घेता व जागेचा कोणताही मोबदला न देता बेकायदेशीर ताबा घेऊन त्यावर एस टी बस्थानाकाचे कामचालू आहे या जागेचे 7/12 उतारे हे आज ही मूळ जमीन मालकांच्या नावावर आहेत या जागेचे कोणत्याही प्रकारचे संपादन/ हस्तांतरण झाले नाही त्यामुळे ही जागा आज ही मूळ मालकांच्या नावावरील महार वतनाची जागा आहे या संदर्भात 8जानेवारी 2024 रोजीपासून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बेमुदत चक्री धरणे आंदोलन बारामती बस्थानकच्या समोर चालू होती
प्रशासनाकडून सदरील आंदोलनाची दखल न घेतल्याने आणि टाळाटाळ दिशाभूल केल्याने 19 व्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्वच्या वतीने मोर्चा काढून समोहिक आत्मदहन करण्याचा इशारा देऊन आंदोलन स्थळापासून मोर्चा काढण्यात आला पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतल्याने धडक मोर्चा काढून प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात बाहेर निर्णया संदर्भात ठिय्या धरण्यात आला प्रशासनाने दिशाभूली उत्तरे दिल्याने त्याला कायदेशीर उत्तर देऊन जागा संपादन करण्यात आली नसल्याने व मूळ मालकांनी कोणताही दस्त, भाडेकरार, बक्षीस पत्र, अथवा कोणत्याही प्रकारच्या कागदावर सह्या केल्या नसल्याने एस टी महामंडळच अन ऑथराईज होल्डर आहे का याबाबतची चौकशी करण्याची व जागा परत मूळ मालकांना करण्याची किंवा संपादन करण्याची कार्यवाही करून बारामती बसस्थानकाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली हे लावून धरल्याने प्रशासनाने याबाबतची चौकशी करण्याचे पत्र दिले नंतर सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करून पुढील लढाई ही प्रशासकीय तसेच कोर्टाची करण्यात येणार आहे तसेच जो पर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत बारामती बसस्थकाचे उदघाट्न होऊ देणार नाही अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी दिली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात, महासचिव प्रतिक चव्हाण, सहसचिव कृष्णा साळुंके, शहराध्यक्ष रियाज खान, सचिव विनय दामोदरे, मोहन शिंदे, सागर गवळी, अखिल बागवान, आनंद जाधव जितेंद्र कवडे, मयूर सोनवणे, शिवाजी सोनवणे, सुरज गव्हाळे, दिनेश सोनवणे, आदेश निकाळजे, विकास माने, दत्ता चितारे, कांता सोनवणे, कविता सोनवणे, प्रिया सोनवणे, अनिता निकाळजे, आदी पदाधिकारी व मूळ मालक, तसेच बहू संख्य महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment