संतापजनक..अधिकाराचा गैरवापर करत विस्तार अधिकाऱ्याकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेवर बलात्कार.
पुणे :-महिला नोकरी करताना किती अडचणी ला सामोरे जात असतील याची कल्पना सुद्धा करू शकत नाही, वरीष्ठ अधिकारी यांची मर्जी सांभाळण्यासाठी कोणत्या थराला जावं लागत असेल की त्याला बळी पडत असेल हे शासकीय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या काही महिलांना अनुभव आले आहेत, नुकताच जिल्हा परिषदेच्या शिक्षिका विस्तार अधिकारी यांनी केलेल्या अत्याचारात बळी पडल्यात याबाबत मिळालेली माहिती अशी की, ग्रामीण भागातील एका शिक्षिकेवर गोपनीय शेरे खराब करून अडचणीत आणून नोकरी गमावण्यास भाग पाडेन, असा दबाव टाकत विस्तार अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी आत्महत्या करण्याची धमकी देखील या विस्तार अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात सचिन हरिभाऊ लोखंडे (वय 47, रा. वारजे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 35 वर्षीय शिक्षिकेने तक्रार दिली आहे. हा प्रकार गेल्या सात वर्षांपासून सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार पीडिता शाळेत शिक्षिका आहेत. तर जिल्हा परिषदेत सचिन लोखंडे हा विस्तार अधिकारी आहे.दरम्यान, सचिन व पीडितेची 2016 पासून ओळख आहे.या ओळखीनंतर अधिकारी पदाचा गैरवापर करून त्यांना
नोकरी घालवण्याची तसेच गोपनीय शेरे खराब करून अडचणीत आणेल, असा दबाव टाकत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार करण्यात आली असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment