एकीसोबत साखरपुडा दुसरीसोबत लग्न,बाबुर्डी येथील बहाद्दराची शक्कल जोरात.!नातेवाईकासह निघाली जेल मध्ये वरात..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 2, 2024

एकीसोबत साखरपुडा दुसरीसोबत लग्न,बाबुर्डी येथील बहाद्दराची शक्कल जोरात.!नातेवाईकासह निघाली जेल मध्ये वरात..!!

एकीसोबत साखरपुडा दुसरीसोबत लग्न,बाबुर्डी येथील बहाद्दराची शक्कल जोरात.!
नातेवाईकासह निघाली जेल मध्ये वरात..!!
बारामती:-बारामती तालुक्यातील एका बहाद्दराने भलताच पराक्रम केला आहे. एका मुलींसोबत लग्न होऊन आठ दिवस उलटत नाहीत तो पर्यंत दुसऱ्या लग्नाची तयारी केली. साखरपुडा दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा करून हळद ही लावली आणि लग्नाच्या वेळी पसार झाला. या घटनेनंतर फसवणूक झालेल्या मुलीने मुलगा यश नवनाथ खोमणे व त्याचे आई,वडील,चुलते व मामा यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कीं, यश नवनाथ खोमणे याचे चुलते शेखर खोमणे बारामती तालुक्यातील बांबुर्डी येथील वस्तीगृहावर अधीक्षक म्हणून काम कार्यरत आहेत. या वस्तीगृहात पीडित तक्रारदार मुलीचा भाऊ शिक्षणाला होता. त्यावेळी त्याला भेटायला जात असताना आरोपी यश व पीडित मुलगी याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेऊन पीडित मुली बरोबर यश याने प्रेम संबंध स्थापन करून त्यांना वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर मुलीला लग्नाचे करण्याचे वचन देऊन लोणावळा, बारामती एमआयडीसी व  इतर ठिकाणी लॉजवर जाऊन बलात्कार केला.

त्याचवेळी मुलाच्या आई वडिलांनी त्या पीडित मुलीला तू खालच्या समाजाची आहे आमच्या मुलाशी लग्न करू शकत नाही,असे म्हणून अपमानीत केले. त्याचवेळी खामगाव ता. फलटण तालुक्यातील खामगाव येथील एका नात्यातल्या मुलीशी आरोपी यश याचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पहिल्या प्रेयसी ला दिलेला शब्द पाळण्यासाठी परत तिच्याशी लग्न करण्यासाठी यश खोमणे याने दुसऱ्या पीडित मुलीशी साखरपुडा करुन लग्नाची तारीख पक्की केली. पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करून हळदी लावून घेतल्या आणि ऐन लग्नाच्या वेळीस मुलाने धुम ठोकली. याबाबत पीडित मुलीने आरोपी यश नवनाथ खोमणे त्याचे वडील नवनाथ खोमणे, चुलते शेखर खोमणे, आई व मामा यांच्या विरोधात बलात्कार, ऍट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी यश नवनाथ खोमणे याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.

No comments:

Post a Comment