आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला काळी शाई फासून जाहीर निषेध व तक्रार दाखल..
वालचंदनगर:- राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध आनंदनगर, जंक्शन, वालचंदनगर, सणसर, निमसाखर व कळंब परिसरातील बजरंग दल व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन वालचंद नगर पोलीस स्टेशन ला आज 05/01/2024 रोजी तक्रार दाखल केली.तसेच बारामती-इंदापूर मार्गावर मु.पो. जंक्शन ता. इंदापूर येथील मुख्य चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या फोटो ला काळी शाई फासून चप्पल ने बदडून जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांन बद्दल जाणीवपुर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा घोषणा देऊन निषेध केला.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सुरेश कापडी, अरविंद बुचके व विजय पिटके तसेच श्री अप्पासाहेब क्षीरसागर, सागर फडणीस, योगेश कणसे, संदिप कणसे, सौरभ चव्हाण, बजरंग रायते, सागर गुप्ते, संदीप कोकरे, दिपक खरे, सुहास वाळिंबे, देवेंद्र पालीवाल, अजिनाथ रूपनवर, भाजपचे माऊली चौरे, सचिन अचलारे इत्यादी व बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि बहुसंख्य रामभक्त उपस्थित होते.यावेळी माजी सैनिक श्री महेंद्र चव्हाण यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व जहाल शब्दात निषेधात्मक मनोगत व्यक्त केले.यावेळी वालचंद नगर पोलीस स्टेशन तर्फे पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली व पो.हवालदार गणेश काटकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment