वसंत मुंडेंचा वृत्तपत्रांच्या अर्थकारणाचा अजेंडा विधानसभेत मांडणार - आमदार संदीप क्षीरसागर यांची दर्पणदिनी ग्वाही - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 6, 2024

वसंत मुंडेंचा वृत्तपत्रांच्या अर्थकारणाचा अजेंडा विधानसभेत मांडणार - आमदार संदीप क्षीरसागर यांची दर्पणदिनी ग्वाही

वसंत मुंडेंचा वृत्तपत्रांच्या अर्थकारणाचा
 अजेंडा विधानसभेत मांडणार - आमदार संदीप क्षीरसागर यांची दर्पणदिनी ग्वाही
- बीड ही वृत्तपत्रांची पंढरी: प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

बीड (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे हे वृत्तपत्रांचे अर्थकारण पोटतिडकिने मांडत आहेत. छोटी वृत्तपत्रे आणि पत्रकारांचे प्रश्नांच्या
अर्थकारणाचा अजेंडा विधानसभेत मांडणार असल्याची ग्वाही बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.तर
बीडच्या पत्रकारितेने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून बीड ही खऱ्या अर्थाने वृत्तपत्रांची पंढरी आहे, स्थानिक वृत्तपत्र लोकांची प्रश्न लोकांच्या भाषेत मांडतात त्यामुळे वृत्तपत्रांना लोकाश्रय असल्याने ते टिकून आहेत.अशा शब्दांत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बीडच्या पत्रकारितेचा गौरव केला. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने शनिवार, ६ जानेवारी २०२४ रोजी दर्पण दिनानिमित्त बीड येथील स.मा.गर्गे भवन येथे कर्तृत्ववान पत्रकारांचा गौरव करण्यात आला. 
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार उषाताई दराडे, उपविभागीय अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, संपादक संतोष मानूरकर, आदींची उपस्थिती होती. 
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडची पत्रकारिता निर्भीड असून ती डोळ्यात अंजन घालणारी आहे. वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि  पत्रकारांच्या इतर मागण्या तडीस नेण्यासाठी  विधानसभेत आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली दिली. 
अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे 
म्हणाले, बीडच्या प्रगल्भ पत्रकारितेला मोठा वारसा आहे. बीडच्या पत्रकारितेला केवळ लोकाश्रय असल्यामुळेच ती निर्भीड झाली आहे, बीड ही  खऱ्या अर्थाने वृत्तपत्रांची पंढरी आहे. स्थानिक वर्तमानपत्र आणि काम करणाऱ्या संपादक पत्रकारांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. इथली वर्तमानपत्र लोकांचे प्रश्न लोकांच्या भाषेत मांडतात इथं कोणतीही बातमी विषय जपला जाऊ शकत नाही त्यामुळे वर्तमानपत्रांना लोकाश्रय आहे असे मत व्यक्त केले.
तर वृत्तपत्रात येणार्‍या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बातम्यांकडे प्रशासन म्हणून आम्ही बारकाने लक्ष ठेवतो, त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी वृत्तपत्र हे प्रमुख माध्यम ठरते, असे उपविभागीय अधिकारी करिष्मा नायर यांनी सांगितले. 
प्रस्ताविक संपादक संतोष मानुरकर तर सुत्रसंचालन पत्रकार संघाचे  मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले. सर्वोत्तम गावस्कर, नरेंद्र कांकरिया, विलास तोकले, काझी मगदूम, आदींनीही आपले मनोगत मांडले. 
 या शानदार पुरस्कार सोहळ्यास आणि दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख, सुर्योदयचे संपादक गंगाधर 
काळकुटे, आरोग्यदूतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने,  पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांसह बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधव,भगिनी, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या दिग्गज बीडकरांचा झाला दर्पण दिनी गौरव

दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर बीडचे दर्पणकार या नामांकित पुरस्काराने बीडचे भूषण म्हणून पश्चिम भारताचे पीटीआय प्रमुख विलास तोकले, मराठी दर्पणकार म्हणून सुराज्यचे संपादक सर्वोत्तम गावस्कर, उर्दू दर्पणकार दैनिक तामिरचे संपादक मकदूम काझी, इंग्रजी दर्पणकार म्हणून लोकमत टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी सी. आर. पटेल, हिंदी दर्पणकार दैनिक लोकमतचे उपसंपादक अनिल भंडारी, इलेक्ट्रॉनिक मीडिया दर्पणकार म्हणून टीव्ही 9 चे महेंद्र मुधोळकर, न्यूजपोर्टल सोशल मीडिया दर्पणकार संग्राम धनवे, युट्युब सोशल मीडिया दर्पणकार संतोष ढाकणे आणि अब्दुल कलाम वैचारिकदूत पुरस्काराचे मानकरी आष्टी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते भीमराव गुरव या 
दिग्गज बीडकरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

No comments:

Post a Comment