प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे ग्रामीण डाक विभागातर्फे सर्व ग्रामपंचायतीमध्ये डाक मेळावा..
पुणे:- भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारी ला पुणे ग्रामीण डाक विभागातर्फे सर्व ग्रामपंचायती मध्ये ग्राम सभेदरम्यान डाक मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थांना डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध आकर्षक गुंतवणुकीच्या व विमा योजनांबाबत स्थानिक पोस्टमास्तर व डाक कर्मचारी यांचेकडून माहिती दिली जाणार आहे. डाकघरात केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित असल्यामुळे व गुंतवणुकीवर मिळणारे व्याजदर इतर सरकारी व खाजगी बँकापेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहक व नागरिकांचा डाकघरात गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे.तरी पुणे ग्रामीण डाक विभागातील सर्व सरपंच यांनी प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभेदरम्यान डाक मेळावा आयोजित करण्यासाठी स्थानिक पोस्टमास्तर याना सहकार्य करून डाक विभागाच्या विविध योजनेमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री
बी. पी. एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment