जिजाऊ - अहिल्या-सावित्री - रमाई लेकी उपक्रम संपन्न..
बारामती:- गुरुवार दिनांक ११/०१/२०२४ रोजी वर्ष चौथे जिजाऊ -सावित्री -अहिल्या -रमाई लेकी हा उपक्रम जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे बारामती मध्ये साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे व्याख्याते डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे सर ,शिवश्री राहुलजी पोकळे (संस्थापक अध्यक्ष राष्ट्रसेवा समूह, उद्योजक, पुणे),श्री.सुनील दादा पवार (सभापती मार्केट कमिटी ,बारामती), श्री.शिवाजीराव टेंगले (मा. चेअरमन संचालक खरेदी-विक्री संघ), श्री.विक्रम आनंदराव भोसले (चेअरमन खरेदी विक्री संघ बारामती), श्री.अमरसिंहदादा जगताप (माजी संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना ), गोपीचंद आप्पा जगताप (सामाजिक कार्यकर्ते), श्री.उदय काका धुमाळ (संचालक खरेदी -विक्री संघ, बारामती ), श्री.नरेंद्रजी जगताप सर (सोशल मीडिया अध्यक्ष), श्री.लक्ष्मण तात्या जगताप (मा. संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना),श्री.अरविंद तात्या जगताप (सचिव, मार्केट कमिटी बारामती), श्री.अनिलराव तावरे (वार्ताहर दैनिक पुढारी),श्री.संदीप जगताप (सामाजिक कार्यकर्ते), श्री.विष्णुपंत जगताप (माजी महाव्यवस्थापक बारामती दूध संघ), श्री.संग्राम जगताप (माजी सरपंच धुमाळवाडी), श्री.सत्यजित दादा जगताप (संघटक संभाजी ब्रिगेड, पुरंदर ),श्री.विजय आप्पा तावरे(केमिकल इंजिनिअर, मा संचालक माळेगाव सहकारी सा कारखाना शिवनगर, शिवश्री दिपक भराटे साहेब, शिवश्री.सुनील पासलकर (उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे), शिवश्री. कुलदीप गाढवे (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड दौंड), शिवश्री.तुषार तुपे (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती), शिवश्री.अस्लम तांबोळी ( शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती) सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नॅशनल लेवल रंगोत्सव आर्ट कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला. इयत्ता नववी मधील सुमेधा चौधरी या विद्यार्थिनीने जिजाऊ बद्दल व वैभवी तावरे या विद्यार्थिनीने सावित्रीमाई बद्दल आपले विचार मांडले. प्रमुख व्याख्याते डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे सर यांनी आजचे शिक्षण, शिक्षक आणि पालक जबाबदारी या विषयावर बहुमूल्य असे मार्गदर्शन ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थ्यांना केले, श्री.उदय काका धुमाळ संचालक खरेदी-विक्री संघ बारामती यांनी स्कूलला ११०००/- रुपये देणगी दिली. त्यांचे स्कूलच्या वतीने शिव आभार .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुमताज इनामदार मिस यांनी केले तसेच स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री विनोदजी जगताप सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले स्कूलच्या प्रिन्सिपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप मॅडम यांनी आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे शिव आभार व्यक्त केले.अशा उत्साहात उस्फूर्तपणे कार्यक्रम साजरा झाला.
No comments:
Post a Comment