बापरे..हनी ट्रॅप सारखा प्रकार का वाढतोय बारामतीत,किती जण अडकलेत..?
बारामती:- प्रेम आंधळं असतं म्हणतात पण ते इतकेही आंधळं नसावं की ते इतकं फसले जावे की एखाद्याचा बळी जाईल. तर काही हौशी नवशी महाभाग अश्या काही महिलांच्या आहारी जाऊन त्यांच्याशी मैत्री करतात नंतर त्यातून हनी ट्रॅप सारखा प्रकार करून नंतर ब्लॅक मेल केलं जातं अश्या अनेक घटना घडत आहे तर कुठे त्या आर्थिक देवाण घेवाण करून दाबल्या जात असल्याचे दिसत आहे. बारामती व एमआयडीसी व तालुक्यातील काही ठिकाणी अश्या सर्रास घटना घडत आहे त्यामुळे खऱ्या खुऱ्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना न्याय मिळण्यास खूप त्रास होत आहे.काही ठिकाणी महिलांचा गट करून अधिकारी व पुढारी गळाला लावून त्यांना मोहजालात फसवायचे आणि नंतर त्याचा कार्यक्रम करायचा यामधून लाखो रुपये उखळले जात असल्याचे समजत आहे. म्हणतात ना 'घर का भेदी लंका ढाए' असा प्रकार होतो जो जिवापाड व अगदी जवळचा झालेला असतो तोच घात करतो, आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात हे यावरून दिसून येते, बारामतीत व एमआयडीसीत अश्या घटना समोर येतील याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे व पुढील अनर्थ टळला जाईल. अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. अश्या घटनांचा भांडाफोड लवकरच फुटणार असून कडक कारवाईची मागणी केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment