टपाल खात्याच्या विमा योजनेतील वारसाला ५ लाख ७८ हजार धनादेश सुपूर्द.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 16, 2024

टपाल खात्याच्या विमा योजनेतील वारसाला ५ लाख ७८ हजार धनादेश सुपूर्द..

टपाल खात्याच्या विमा योजनेतील वारसाला ५ लाख ७८ हजार धनादेश सुपूर्द..
पुणे:- भारतीय टपाल जीवन विमा योजनेतून विमा कवच घेतलेल्या मृताच्या वारसदाराला ५ लाख ७८ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.खेड तालुक्यातील तळेगाव रोड चाकण येथील किरण रामराव शिंगाडे यांनी दि.०५/१२/२०२० रोजी ५ लाखाची
टपाल जीवन विमा घेतला होता व त्यांचा महिन्याला नियमित हफ्ता १९७५ भरला होता. यांचा दि. १८.१२.२०२२ रोजी रोड अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात वारसदार म्हणून त्यांची पत्नी अश्विनी किरण शिंगाडे यांना टपाल जीवन विमा योजनेतून ५ लाख ७८ हजार रुपयाचा धनादेश पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर श्री बा.पो. एरंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डाक विभागाच्या टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेची माहिती सांगण्यात आली. या प्रसंगी शिवाजीनगर प्रधान डाकघराचे पोस्टमास्तर श्री मारुती डिंबळे उपस्थित होते.
डाक विभागाची विमा योजना हिताची
डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना कर्मचारी, शेतकराच्या हितासाठी खूप
चांगली आहे. या योजनेत कमी हफ्ता जास्त बोनस मिळतो. ग्रामीण भागातील व्यापारी,
शेतकऱ्यांना १० लाखाचा तर सरकारी कर्मचारी, डॉक्टर, इंजीनिअर, वकील, डिप्लोमाधारक व
पदवीधरानादेखील ५० लाखा पर्यंत विमा घेता येतो. तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे
आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बा.पो.एरंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment