RTO तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने कलेक्शन चालू?'कलेक्शन'च्या वादातून गोळीबार झाल्याचे उघड..
बजाजनगर:- नुकताच आर टी ओ कार्यलयातील अधिकारी यांच्यात झालेल्या गोळीबार प्रकरण ताजे असताना त्यात काही महत्वाची माहिती समोर येतेय, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) गोळीबार प्रकरणाच्या तपासाला नवे वळण आले असून महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड यांच्यात भरारी पथकाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या पैशाच्या वाटपावरूनच गोळीबार
झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. त्यानुसार, पोलिस अधिकारी आता तांत्रिक पद्धतीने तपास करीत, पुरावे गोळा करीत आहेत.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड आरटीओच्या भरारी पथकात होते. या भरारी पथकाने नेतृत्व यापूर्वी महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्याकडे होते.
आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने गायकवाड यांच्यावर कलेक्शन करण्यात आल्याचा आरोप आहे. मोटार वाहन निरीक्षक गायकवाड आणि शेजवळ
यांच्यात 'कलेक्शन'वरून वाद झाला, ज्याची परिणती गोळीबारात झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेने संकेत गायकवाड यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तिसरी नोटीस बजावली आहे.गायकवाड यांची पत्नी कोमल गायकवाड आणि गीता शेजवळ यांचे पती मोटार वाहन निरीक्षक अभिजित मांढरे यांना तीन नोटिसा पाठवल्यानंतरही ते अद्याप गुन्हे
शाखेसमोर हजर झाले नाहीत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शहर पोलिसांनी संबंधित
आरोपींविरुद्ध तांत्रिक पद्धतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. गीता शेजवळ यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे पाच ते सहा गुन्हे दाखल
असल्याची माहितीही पोलिसांनी गोळा केली आहे, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला आहे.महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्यांनी बुधवारी तातडीने वरिष्ठ अधिवक्ता अनिल मार्डीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती ऊर्मीला फाळके-जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यात नकार दिला.पोलिसांना नोटीस बजावत या प्रकरणाची सुनावणी उद्या निश्चित केली. तक्रारकर्त्यांच्या वतीने अॅड. देवेंद्र
चौहान बाजू मांडणार आहेत. गीता शेजवळांवर मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
No comments:
Post a Comment