बारामती सहकारी बँकेचा सन 2022-23 सालचा लाभांश जाहीर..
सहकारी बँक असून बँकेचा एकूण व्यवसाय 3500 कोटींवर गेलेला आहे. बँकेच्या
दि. 31 मार्च 2023 अखेरच्या आर्थिक प्रगतीनुसार रिझर्व बँकेने सभासदांना त्यांच्या
भागावर शेकडा 5 टक्के दराने लाभांश जाहीर करण्यास परवानगी दिली आहे. बँकेने
राबविलेल्या विशेष वसुली अभियानामुळे बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम झालेली असून
बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण शेकडा 13.50 टक्के इतके झालेले आहे. या गतआर्थिक
वर्षाअखेर बँकेस रू. 5.21 कोटी इतका निव्वळ नफा सर्व तरतुदी व आयकराची तरतुद
करून झालेला आहे.दि. 31 मार्च 2023 अखेर बँकेच्या ठेवी रू. 2222.10 कोटी व कर्जवाटप रू. 1406.32 कोटी इतके झालेले असून बँकेची गुंतवणूक रू. 835.17 कोटी वर पोहोचलेली आहे.बँकेस मिळालेल्या यशाबद्दल सभासद व खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.बँक आगामी काळातही विक्रमी नफा कमावून सभासदांना भागावर आणखी जादा लाभांश पुढील आर्थिक वर्षासाठी जाहीर करेल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सदाशिवराव सातव यांनी या प्रसंगी बोलताना जाहीर केला.
बँकेच्या आजपर्यंच्या विकासामध्ये सभासदांचा बँकेवरील अढळ विश्वास, खातेदारांचे
बँकेबरोबरचे अतूट नाते व ग्राहकांचा संतोष याचेच पाठबळ लाभलेले आहे.
बँकेच्या वाटचालीत महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा. ना. श्री. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. सौ. सुनेत्रावहिनी पवार, अध्यक्षा बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क यांचे सततचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच बँकेचा उत्तरोत्तर विकास होत असल्याचे अध्यक्षांनी यावेळी आवर्जुन नमूद केले.बँकेचे प्रगतीत बँकेचे उपाध्यक्ष श्री. किशोर शंकर मेहता तसेच सर्व सहकारी संचालक अॅड. श्री. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी, श्री. देवेंद्र रामचंद्र शिर्के, श्री. उध्दव सोपानराव गावडे,श्री. विजयराव प्रभाकरराव गालिंदे, श्री. नामदेवराव निवृत्ती तुपे, श्री. मंदार श्रीकांत सिकची, डॉ. सौरभ राजेंद्र मुथा, श्री. जयंत विनायकराव किकले, श्री. रणजित वसंतराव धुमाळ, श्री. रोहित वसंतराव घनवट, सौ. नुपूर आदेशकुमार शहा (वडूजकर), डॉ. वंदना उमेश पोतेकर, सौ. कल्पना प्रदिप शिंदे व तज्ञ संचालक श्री. प्रितम सुर्यकांत पहाडे (सी.ए.)
तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. शांताराम चिमाजी भालेराव, डॉ. श्री. अमोल चंद्रभान गोजे व अॅड. श्री. रमेश भगवानराव गानबोटे, मुख्यालयीन अधिकारी वर्ग, सर्व शाखाधिकारी, वसुली अधिकारी व बँकेचा सर्व सेवकवर्ग तसेच हितचिंतक यांनी घेतलेल्या परिश्रमाबदद्ल अध्यक्षांनी सर्वांचे मनपुर्वक आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment