खळबळजनक..वेळेवर उसनवारीचे पैसे न दिल्याने युवकाचा दगडाने ठेचून खून..
यवतमाळ(प्रतिनिधी) :- शहरात शुक्रवारी रात्री गोदनी मार्गावर गुरुनानक नगर मध्ये साडेतीन हजाराच्या उसनवारी करिता दगडाने ठेचून युवकाचा खुन करण्यात आला. सचिन शंकर माटे असे मृताचे नाव आहे. तो गुरुनानक नगरमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. या प्रकरणी सचिनचे वडील सुखदेव शंकर माटे रा. गुरुनानक नगर गोधणी रोड यवतमाळ यांनी तक्रार दिली त्यावरून अवधुतवाडी पोलिसांनी विक्की भेंडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
सचिनने घराशेजारी राहणाऱ्या विक्की कडून ३ हजार ५०० रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सचिन वेळेत परत करू शकले नाही, पैश्याकरिता विक्की नेहमी तगादा लावत होता. शुक्रवारी सचिन जेवण करून घराबाहेर पडला असता त्याच्यावर विक्की व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला
करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस, अपर अधीक्षक पियुष जगताप यांनी घटना स्थळी भेट दिली. शुक्रवारी रात्री पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून तपास चालु आहे.
No comments:
Post a Comment