श्री क्षेत्र मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिर पार्किंग मध्ये सार्वजनिक शौचालयाची गरज..
मोरगाव(संतोष जाधव):-बारामती तालुक्यातील व अष्टविनायका पैकी एक श्री क्षेत्र मोरगाव मोरया चं मंदिर या साठी महाराष्ट्र व बाहेरून भक्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात,लांबच्या प्रवासातून आल्यानंतर प्रथमतः काही महिला भगिनी,वयोवृद्ध,लहान मुलं यांना खऱ्या अर्थाने सार्वजनिक शौचालयाची गरज भासत असते मात्र याठिकाणी मोरगाव व पुणे रोड लगत असणारे पार्किंग स्थळ जे ग्रामपंचायत चालवीत आहे अश्या ठिकाणी वाहन पार्किंग केल्यानंतर जवळ कुठेही शौचालय दिसत नाही त्यामुळं महिला वर्गांना याचा खूप त्रास होत असतो परंतु त्या बोलू शकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया याठिकाणी येण्याऱ्या भक्त भाविक करताना दिसतात. यासाठी तात्काळ पार्किंग मध्ये शौचालय ची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे, याबाबत लवकरच पार्किंग मध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करावी या मागणीसाठी मोरगाव ग्रामपंचायत समोर महिला भगिनी आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment